Ranbir Kapoor: उर्फीच्या फॅशनची रणबीर कपूरने घेतली दखल, म्हणाला.. ठीक आहे जर..!

भल्याभल्यांना आपल्या फॅशनने गार करणाऱ्या उर्फी जावेदने पुन्हा एकदा एका बॉलिवूड अभिनेत्याला आपल्या फॅशनच्या गऱ्हाळ्यात ओढले.
Ranbir Kapoor And Urfi Javed
Ranbir Kapoor And Urfi JavedSaam Tv

Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर उर्फी जावेद नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या फॅशनची चर्चा सर्वाधिक सोशल मीडियावर होत आहे. भल्याभल्यांना आपल्या फॅशनने गार करणाऱ्या उर्फी जावेदने पुन्हा एकदा एका बॉलिवूड अभिनेत्याला आपल्या फॅशनच्या गऱ्हाळ्यात ओढले.

Ranbir Kapoor And Urfi Javed
Mrs India Beauty Pageant: अखेर ज्योती अरोरा ठरली ‘मिसेस इंडिया’, पटकावला मानाचा पुरस्कार

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना उर्फीची फॅशन खूप आवडली आहे, तर काहींना तिची फॅशन मूर्खपणाचा कळस वाटतोय. कोणाला काही ही वाटू द्या उर्फी जावेद तिची फॅशन सोडणार नाही. अलीकडेच या सर्वांमध्ये रणबीर कपूरने उर्फीच्या फॅशनवर भाष्य केले. नुकतंच रणबीरने करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या शो मध्ये हजेरी लावली होती.

Ranbir Kapoor And Urfi Javed
तड तड तड तड....गौतमीचा आतापर्यंतचा सगळ्यात खतरनाक डान्स; Video Viral

या शोमध्ये करीनाने एक खेळ खेळला, त्यात रणबीरला सेलिब्रिटींचे काही चेहरे दाखवण्यात आले. त्यांचे कपडे पाहून त्याला त्यांच्या फॅशन बद्दल आणि त्या सेलिब्रिटीबद्दल सांगायचे होते. या सेगमेंटमध्ये करीनाने जेव्हा उर्फीचा फोटो दाखवला तेव्हा रणबीर म्हणतो, ही तू आहेस का? बरं झालं असतं मी तिथे असते तर असं करीना म्हणते. मला वाटतं कदाचित तुला माहित असेल ही अभिनेत्री कोण आहे ते... मग रणबीर म्हणतो ही उर्फी आहे का? करीना त्याला हो बोलते.

रणबीर म्हणतो, “ मला अशा प्रकारची फॅशन नाही आवडत. पण माझ्या अंदाजे, तुम्हाला जर त्यात आराम वाटत असेल तर ठीक आहे.” रणबीर सिंग, प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता यांनी ऊर्फीच्या फॅशनचे अनेकदा कौतुक केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com