Ranbir-Alia On Paparazzi: रणबीर-आलियाच्या आयुष्यात डोकावणं भोवणार; पापाराझींवर होणार कायदेशीर कारवाई

पापाराझींचे कॅमेरे थेट रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरात, परवानगी न घेता केले शूटिंग.
Ranbir-Alia were taking legal action against Paparazzi
Ranbir-Alia were taking legal action against PaparazziSaam Tv

Ranbir Kapoor Will Take Legal Action On Paparazzi: सेलिब्रिटींच्या आयुष्याविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. तर सेलिब्रिटी त्यांचे खासगी आयुष्यातील सगळंच जगासमोर येणार नाही याची काळजी घेतात. परंतु असे असले तरी लोक त्याच्या घरात डोकाविण्याचे विविध प्रयत्न करतातच.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरातील फोटो काढल्यामुळे तिने पापाराझींना खडे बोल सुनावले होते. आलिया तिच्या लिव्हिंग रूममध्ये होती तेव्हा बाजूच्या छतावरून दोन लोक तिचे शूटिंग करत होते. आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये या घडणेच उल्लेख केला होता.

Ranbir-Alia were taking legal action against Paparazzi
Viral Video: WPL मध्ये पठानचा जलवा! महिला खेळाडूंचा 'झुमे जो पठान'वर जबरदस्त डान्स

आता रणबीर कपूर पत्नी आलियाच्या गोपनीयतेप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहे. रणबीर कपूरने सांगितले की, ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे आणि सध्या या संपूर्ण प्रकरणात आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करत आहोत.

एका मुलाखती दरम्यान रणबीरने सांगितले की, 'ही घटना अत्यंत वाईट आहे. हे एखाद्याच्या खासगी जीवनातील गोपनीयतेचे उल्लंघन आहे. तुम्ही माझ्या घरात शूट करू शकत नाही. माझ्या घरात काहीही होऊ शकते. ते माझे घर आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही या संपूर्ण प्रकरणावर योग्य कायदेशीर मार्गाने कारवाई करत आहोत. मात्र, रणबीरने याबाबत जास्त बोलण्यास नकार दिला आणि जे काही घडले ते अतिशय वाईट असल्याचे सांगितले.

Ranbir-Alia were taking legal action against Paparazzi
Shireen Mirza : मालिकेच्या सेटवरच टीव्ही अभिनेत्री बेशुद्ध होऊन कोसळली, रुग्णालयात दाखल

रणबीर म्हणाला, 'आम्ही पापाराझींचा आदर करतो. मला वाटते की पापाराझी हा आपल्या जगाचा एक भाग आहेत. ते आमच्यासाठी काम करतात आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतो' पण अशा गोष्टी करणे खूप लाजिरवाण्या आहेत.'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com