Shamshera New Poster: कपाळावर टिळा, हातात चाबूक...संजय दत्तचा इतका भयंकर अवतार कधी पाहिलाय का?

'शमशेरा'चे नवीन पोस्टर रिलीज केला आहे. चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देत निर्मात्यांनी 'दरोगा शुद्ध सिंह' म्हणजेच संजय दत्तचा लूक प्रदर्शित करून चाहत्यांना धक्का दिला आहे.
Shamshera New Poster: कपाळावर टिळा, हातात चाबूक...संजय दत्तचा इतका भयंकर अवतार कधी पाहिलाय का?
Sanjay Dutt Shamshera Poster OutSaam Tv

मुंबई : 'शमशेरा'(Shamshera) हा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि संजय दत्तची भूमिका असलेला चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाचा जबरदस्त टीझर २२ जून रोजी निर्मात्यांनी रिलीज केला आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २४ जून रोजी रिलीज होणार आहे. याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. निर्मात्यांनी नुकताच 'शमशेरा'चे नवीन पोस्टर रिलीज केला आहे. चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देत निर्मात्यांनी 'दरोगा शुद्ध सिंह' म्हणजेच संजय दत्तचा लूक प्रदर्शित करून चाहत्यांना धक्का दिला आहे.

Sanjay Dutt Shamshera Poster Out
आय लव्ह उद्धव...!; मुख्यमंत्री ठाकरे यांना आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा

'शमशेरा'चा ट्रेलर रिलीज होण्याच्या एक दिवस आधी निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. पोस्टरमध्ये संजय दत्तचा भयानक अवतार समोर आला आहे. लहान केसांसह चेहऱ्यावरची दाढी आणि भारदस्त मिशा यामुळे संजय दत्तचा लूक खतरनाक दिसत आहे. यासोबतच कपाळावर मोठा टीळा आणि हातात चाबुक घेतलेला हा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चित्रपटाचा हा नवीन पोस्टर यशराज फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये शेअर केला आहे. याशिवाय संजय दत्तने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'शमशेरा'मधील त्याचा हा लूक शेअर केला आहे.

Sanjay Dutt Shamshera Poster Out
Rapper Raftaar Divorce: रॅपर रफ्तार लग्नाच्या ६ वर्षानंतर देणार पत्नी कोमल वोहरला घटस्फोट

दुष्ट व्यक्ती कधीच चांगले दिसत नाहीत. दरोगा शुद्ध सिंह. शमशेरा ट्रेलर उद्या प्रदर्शित, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात २२ जुलैला शमशेरा चित्रपटासह साजरा करत आहोत #YRF50. अशी कॅप्शन यशराज फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर संजय दत्तच्या लूकचा पोस्टर पोस्ट करताना दिली आहे.

हा चित्रपट २२ जुलै २०२२ ला हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, रोनित रॉय आणि त्रिधा चौधरी देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

२०१८ मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 'शमशेरा' व्यतिरिक्त रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये तो पहिल्यांदा आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हे दोन्ही चित्रपट रणबीरचे सर्वाधिक प्रतीक्षेत असणारे चित्रपट आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com