Animal Movie Teaser Date: रणबीर कपूरच्या नव्या लूकने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, अभिनेत्याने शेअर केलेला फोटो व्हायरल

Animal Teaser Update: अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.
Animal Teaser Date Declared
Animal Teaser Date DeclaredInstagram/ @animalthefilm

Animal Movie Teaser Date Declared

सध्या रणबीर कपूर त्याच्या बहुचर्चित ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. रणबीर ‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkaar) नंतर ‘ॲनिमल’ (Animal) मध्ये झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत सातत्याने बदल होताना दिसत आहे. अखेर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १ डिसेंबर ठरवली आहे. येत्या २८ सप्टेंबरला अर्थात अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.

Animal Teaser Date Declared
Jawan Box Office Collection Day 11: ५०० कोटींपर्यंत पोहण्यासाठी इतक्या दूर आहे 'जवान', वर्ल्डवाइड कमाई ८०० कोटींपार

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता दिसून येत आहे. अवघ्या काही वेळापूर्वी, अभिनेता रणबीरने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे. नवा पोस्टर शेअर करताना, अभिनेत्याने चित्रपटाच्या टीझरची डेट देखील जाहीर केली आहे. त्याच्या वाढदिवशी ‘ॲनिमल’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाविषयी प्रत्येक अपडेटवर चाहते लक्ष देऊन आहेत. रणबीर कपूरसह चित्रपटामध्ये नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Animal Teaser Date Declared
Shiv Thakare Welcomes To Police Ganpati Bappa: ढोल ताशाच्या गजरात शिव ठाकरेच्या घरी ‘वर्दीतल्या बाप्पा’चं आगमन, मिरवणूकीत मुंबई पोलिसांचा सहभाग

रणबीरने शेअर केलेल्या पोस्टरबद्दल बोलायचे तर, या पोस्टरवर अभिनेत्याचा राऊडी लूक दिसत आहे. त्याच्या डोळ्याला गॉगल दिसत असून अभिनेत्याच्या तोंडात सिगारेटही पाहायला मिळत आहे. चित्रपटातील अभिनेत्याच्या बॉसी लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टरबरोबर या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत मोठी माहितीसमोर आली आहे. चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com