Animal Movie Update: 'अॅनिमल' सेटवरील रणबीर कपूरचा लूक व्हायरल, चाहत्यांमध्ये वाढली चित्रपटाबद्दल उत्सुकता

'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूरचे अनेक फोटो समोर आले आहेत.
Ranbir Kapoor
Ranbir KapoorSaam Tv

Ranbir Kapoor Animal Movie Look: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणबीर मुलीच्या जन्मानंतर आता कामावर परतला आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूरचे अनेक फोटो समोर आले आहेत. पण या व्हायरल फोटोंमध्ये त्याचा पूर्ण लूक दिसला नव्हता. आता समोर येत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्याचा लूक समोर आला आहे. या फोटोंमध्ये रणबीर रक्ताने माखलेला दिसत आहे.

Ranbir Kapoor
Ved Teaser Out: रितेश देशमुखच्या 'वेड'चा टीझर प्रदर्शित, टीझर पाहून प्रेक्षकांना लागले चित्रपटाचे वेध

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रणबीर अतिशय रफ लूकमध्ये दिसत आहे. तो पांढरा कुर्ता, लांब केस घातलेला दिसत आहे. फोटो पाहता, अभिनेत्याचा हा लूक एखाद्या अॅक्शन सीनच्या शूटिंगनंतरचा असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत आहेत. (Viral Photo)

रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट क्राईम थ्रिलर ड्रामा आहे. या चित्रपटात रणबीर एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे. जो आपल्याच कौटुंबिक समस्यांमध्ये जबरदस्त अडकला आहे. या चित्रपटासाठी रणबीरनेही जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सैफ अली खानच्या रॉयल पतौडी पॅलेसमध्ये होत आहे. रणबीरपूर्वी अनिल कपूरचा चित्रपटाच्या सेटवरील लूकही समोर आला होता. (Ranbir Kapoor)

Ranbir Kapoor Animal Movie Viral Photo
Ranbir Kapoor Animal Movie Viral PhotoSaam Tv

चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजचे भूषण कुमार-कृष्ण कुमार, प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स आणि मुराद खेतानी यांच्या सिने1 स्टुडिओजनी केली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटात निर्माता संदीप रेड्डी वंगा पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि कबीर सिंगसोबत काम करणार आहेत. संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटात रणबीर कपूर एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com