Ranbir Kapoor: ‘आपण जगाला वाचवत नाहीत...’ बॉयकॉट ट्रेंडबद्दल रणबीर जरा स्पष्टच बोलला

बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करणं ‘निराधार’ असल्याचं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे.
Ranbeer Kapoor
Ranbeer KapoorSaam Tv

Ranbir Kapoor On Calls To Boycott Bollywood: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘झुठी मैं मकर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चित्रपटांवर बॉयकॉट टाकण्यात येत आहे. बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करणं ‘निराधार’ असल्याचं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. रणबीरचा ‘झुठी मैं मकर’ हा आगामी चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Ranbeer Kapoor
Urfi Javed: उर्फी 'लॉक अप' अन् 'खतरों के खिलाडी' मध्ये जाणार? खुद्द तिनेच केला खुलासा...

‘झुठी मैं मकर’च्या प्रमोशनमध्ये रणबीर सध्या व्यस्त आहे. रविवारी त्याच्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करताना, रणबीरने क्रिकेटर सौरव गांगुलीच्या बायोपिकची ऑफर दिल्याचे वृत्तही फेटाळून लावले. त्या दरम्यान त्याने स्पष्ट केले की, मी सौरव गांगुलीच्या भूमिकेत दिसणार गायक किशोर कुमारांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ranbeer Kapoor
Abdu Rozik: ३ फूट असणाऱ्या अब्दूची करोडोंची कमाई, महागडं घर, अलिशान गाडी अन् बरंच काही...

माध्यमांसोबत बोलताना रणबीर बोलतो, “‘बॉलिवुडला बॉयकॉट करा’ हे वाक्य मला खरोखरच निराधार वाटते. महामारीनंतर अनेक नकारात्मक गोष्टी बाहेर येत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने चित्रपट बनवले जातात. आपण जगाला वाचवत नाही आहोत. प्रेक्षक आपल्या काळजाचा ठोका विसरण्यासाठी थिएटरमध्ये येतात. ते मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायला येतात आणि आपले मनोरंजन करुन घेतात. मी कधीच चित्रपट बहिष्काराचा विचार करत नाही.”

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com