
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा'ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील कार्तिक आणि दीपा या जोडीवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. अखेर १००० भाग पूर्ण करून या मालिकेने प्रेक्षकांना अलविदा केलं.
मालिका संपल्यानंतर सगळेच कलाकार भावुक झाले होते. खूप काळ एकत्र काम केल्यानंतर सगळ्यांचं एक घट्ट नातं तयार झालं होत. मालिकेला निरोप देताना भावुक झालेल्या दीपा म्हणजे रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
रेश्मा शिंदेची पोस्ट
अभिनेत्री रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर तिचे दोन फोटो पोस्ट करत लिहिले आहे, 'येते हा.. जाते नाही, येते म्हणावं नाही का?.. हा निरोप नाही तर पुन्हा नव्या रूपात येण्याची नांदी आहे असं म्हणेन मी.. या ना त्या वेगळ्या रूपात तुम्हाला नक्की भेटायला येईन ,अशीच सकारात्मक ऊर्जा घेऊन.. कलर गया तो पैसा वापस..!
Thank you स्टार प्रवाह, सतीश राजवाडे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल सगळ्यासाठी खूप धन्यवाद... हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले तुमच्याशिवाय दीपा अपूर्णच..अतुल केतकर, अपर्णा केतकर, अभिजित गुरु माझ्याबरोबर दीपा तुम्ही सुद्धा जगलात.. लेक जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला लेकीप्रमाणे प्रेम मला दिल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल thank you.
आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार या प्रवासात हात घट्ट धरून ठेवलात.. असेच आशीर्वाद राहू दे.. येते... Love you all.. थँक यू रंग माझा वेगळा टीम तुमची नेहमीच आभारी असेन.'
रेश्मा शिंदेचे या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. अभिनेत्री विधिश मस्करने कमेंट केली आहे की, 'दीपा, तुझ्याशिवाय दीपा होऊच शकत नाही. मला तितकी इंटेन्सिव्ह एनर्जी दिल्याबद्दल तुझे खूप आभार. त्याशिवाय चांगला मला चांगला परफॉर्मन्स देता आला नसत. तू खूप हुशार अभिनेत्री आहेस,'
तर श्रेया बुगडेने कमेंट केली आहे की, 'खूप प्रेम. तुला पुन्हा स्किनवर पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही.' (Celebrity)
सेलिब्रेटींसह रसिकप्रेक्षक देखील रेश्माच्या शिंदे पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. तसेच तिला खूप मिस करू असे म्हणत आहेत. (Latest Entertainment News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.