Singham Again Shoot: 'सिंघम अगेन'ला शुभारंभ! अजय देवगणच्या चित्रपटामध्ये खिलाडी कुमारची एन्ट्री

Akshay Kumar Post: अक्षय कुमारच्या 'सिंघम अगेन'च्या पोस्टने मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Akshay Kumar In Singham Again
Akshay Kumar In Singham AgainInstagram @akshaykumar

Akshay Kumar In Singham Again:

रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या 'सिंघम अगेन' अधिकृत घोषणा झाली आहे. रोहित शेट्टी आणि अजय देवगण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अजय देवगण, रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 'सिंघम अगेन'ची घोषणा केली आहे. परंतु अक्षय कुमारच्या 'सिंघम अगेन'च्या पोस्टने मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Akshay Kumar In Singham Again
South Superstar Simplicity: सुपरस्टारचा साधेपणा पाहिलात का? चित्रपटाने ७०० कोटींचं कलेक्शन केलं अन् अभिनेता चप्पल घालून सेलिब्रेशनला आला

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, 'सध्या देशात नसल्याने या फ्रेममध्ये दिसत नाहीये. पण माझा आत्मा तिथेच आहे. तुम्हाला 'सिंघम अगेन'च्या सेटवर भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. तुम्हाला माझा शुभेच्छा. जय महाकाल'

अक्षय कुमारच्या या पोस्टने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजय देवगणच्या चित्रपटामध्ये अक्षय कुमार कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अक्षय कुमार या चित्रपटामध्ये दिसणार असल्याने चित्रपट आणखी दमदार होईल यात शंका नाही. अक्षय कुमारच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते 'रावडी राठोड २' कधी येणार हे विचारत आहेत. (Latest Entertainment News)

'सिंघम' फ्रेंचायजीचा किंग अजय देवगण 'सिंघम अगेन'च्या शुभारंभ पूजेचे फोटो फोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. अजय देवगणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, '12 वर्षांपूर्वी आम्ही भारतीय सिनेमाला सर्वात मोठे सिनेमॅटिक कॉप युनिव्हर्स तयार केले. गेली आम्हाला अनेक वर्षे मिळालेल्या प्रेमामुळे आमची शक्ती मजबूत झाली आणि सिंघम कुटुंब मोठे झाले. आज आम्ही 'सिंघम अगेन'साठी पुन्हा एकत्र आलो आहोत!'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com