Badshah Police Case: रॅपर बादशहाला न्यायालयाचा अल्टिमेटम, हजर राहा नाहीतर...

रॅपर बादशहाला 7 जानेवारी पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Badshah-Honey singh
Badshah-Honey singhInstagram @badboyshah

Badshah-Honey Singh Recived Nagpur Court Notice: रॅपर बादशहा आणि हनी सिंग आधुनिक संगीत जगतातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. पेशाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या बादशहाने हनी सिंगच्या म्युजिक ग्रुपमधून त्याच्या करियरची सुरूवात केली. दोघांची सध्या वेगळी ओळख आहे. परंतु आता दोघेही एकच वेळी अडचणीत आले आहेत. या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर नागपूर कोर्टाकडून त्यांना अल्टीमेटम देखील देण्यात आला आहे.

Badshah-Honey singh
Actor Sudheer Varma Death: साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा; अभिनेता सुधीर वर्माच्या आत्महत्येने खळबळ

प्रसिध्द रॅपर बादशहाला नागपूर न्यायालयाने अल्टीमेटम दिला आहे. बादशाह आणि हनी सिंग यांना 7 जानेवारी पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रॅपर बादशहा आणि पॉप गायक हनी सिंग विरोधात अश्लील गाणं गायल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी घ्यायचे आहेत. या दोघांसाठी उत्तर देण्याची अंतिम संधी आहे. जर यावेळी देखील हे दोघे न्यायालयात हजर राहिले नाही तर बाजू न एकताच निर्णय दिला जाईल असा आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी दिला आहे.

परंतु हनी सिंगने आधीच त्याच्या आवाजाचे नमुने दिल्याची माहिती आहे. त्यामुळे बादशहा पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं आरोप त्याच्या होत आहे. जर त्याने कोर्टात हजेरी लावली नाही कोर्ट त्याची बाजू न ऐकता निकाल देण्यात येईल असे म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com