VIDEO: लहान मुलीचा 'सामी-सामी'वर अफलातून डान्स; पुष्पाच्या श्रीवल्लीलाही मग राहावलं नाही!

आजही या चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहेत.
Viral Video
Viral VideoSaam Tv

School Girl Dance Video: गेल्या वर्षी 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, परंतु आजही या चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहेत. चित्रपटाचा लोकांवर ज्या प्रकारचा प्रभाव पडला आहे तो अभूतपूर्व आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची क्रेझ अजूनही सुरू आहे. लोक आजही या चित्रपटातील गाण्यांवर डान्स रील्स बनवतात.

वेगवेगळ्या प्रकारचे डान्स सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर, तर काही थक्क करणारे असतात. आजकाल डान्स करणं प्रत्येकाला आवडतं. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात ढोल ताशांचा गजर असेल तर पुरूष मंडळी अगदी बेभामपणे डान्स करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये एक लहान शाळकरी मुलगी 'सामी सामी' या गाण्यावर अफलातून डान्स करताना दिसत आहे.

हे देखील पाहा -

हा व्हिडिओ एका शाळेतील डान्स रिहर्सलदरम्यानचा असल्याचे दिसत आहे. इतर मुले देखील तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. याशिवाय, ती गाण्याच्या हुक स्टेपची उत्तम प्रकारे कॉपी करताना दिसली आणि तिने चेहऱ्यावर एक मोहक हास्य कायम ठेवले. मुलीचा हा अफलातून डान्स व्हिडिओ पाहून अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने देखील तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलीचा डान्स पाहून ती खूप प्रभावित झाली आणि कॅप्शनमध्ये मला या गोंडस मुलीला भेटायचे आहे असे देखील ती म्हणाली आहे.

हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनी या छोट्या मुलीचे कौतुक करत तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. एका यूजरने म्हटले की, 'खूपच क्यूट व्हिडिओ'. तर दुसऱ्याने कमेंट केली, 'या व्हिडिओने माझा दिवस बनवला.' सुकुमार दिग्दर्शित अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' हा २०२१ चा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला आणि तसेच आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या तेलुगू चित्रपटांपैकी एक आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com