Fakat Film Actor Experience: ‘मी किस करताना अजिबात लाजत नाही....’ रसिकाने सांगितला रोमँटिक अनुभव

चित्रपटाच्या शूटिंगवेळी सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलसोबत एक किस्सा शेअर केला आहे, रसिकाने चाहत्यांसोबत एक रोमँटिक अनुभव सांगितला..
Rasika Sunil And Suyog Gorhe Fakat Film Experience
Rasika Sunil And Suyog Gorhe Fakat Film ExperienceSaam Tv

Rasika Sunil And Suyog Gorhe Fakat Film Experience: पडद्यावर किसिंग सीन देणं, ही आता मोठी गोष्ट राहिलेली नाही. कलाकारही चित्रपटाचा भाग म्हणून असे सीन करण्यासाठी राजी होतात. पण ‘हे’ असं करण्यासाठी सगळेच कलाकार तयार होतात असं नाही. पण हा किस्सा श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ च्या चित्रिकरणा दरम्यान झाला होता.

Rasika Sunil And Suyog Gorhe Fakat Film Experience
Jr Ntr Fans Burn Firecrackers In Theater: ज्युनियर एनटीआर बर्थडेला चाहत्यांनी थिएटर पेटवलं; व्हिडिओ व्हायरल

चित्रपटाच्या शूटिंगवेळी सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलसोबत हा किस्सा घडला होता. चित्रपटात सुयोगला रसिकाला किस करायचे होते. मात्र तो सीन करण्याकरता सुयोग खरे तयार नव्हता. हा सीन करणे सुयोगला खूपच अवघड जात होते, कारण यापूर्वी त्याने किसिंग सीन कधीच केला नव्हता.

मात्र या सगळ्यात त्याला त्याचीच सहकलाकार रसिका सुनीलने साथ दिली आणि अखेर तो सीन चित्रित झाला. हा सीन कसा चित्रित झाला याचा किस्सा रसिकानेच आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. येत्या २ जूनला रसिका आणि सुयोगमधील हा रोमान्स पडद्यावर पाहायला मिळेल.

Rasika Sunil And Suyog Gorhe Fakat Film Experience
Aai Kuthe Kay Karte Daily Update: ‘तु माझी बायको पळवलीस आता मी तुझी...’ म्हणत साधला डाव; अनिरूद्धची खेळी यशस्वी होणार का?

या सीनबद्दल रसिका सुनील म्हणते, “असा सीन करायचा आहे हे जेव्हा सुयोगला कळले, तेव्हा तो खूप घाबरला कारण आधी त्याने असा सीन कधीच दिला नव्हता. मी हा सीन कारण्यासाठी कम्फर्टटेबल होते. मला काहीच अडचण नव्हती. पण सुयोगला हे जरा विचित्र वाटत होतं. त्याला मी सांगितलं आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि कामाच्या बाबतीत प्रोफेशनलही आहोत, त्यामुळे हा सीन करायला तुला एवढं अनकम्फर्टटेबल व्हायची गरजच नाही. तेव्हा आमच्या दोघांचं लग्नही झालं नव्हतं. तरीही त्याला हे करायला खूप दडपण येत होतं.” (Marathi Film)

“अखेर मी आणि दिग्दर्शक श्रेयश जाधवने भरपूर समजवल्यानंतर किसिंग सीन देण्यासाठी तो तयार झालो आणि हा सीन चित्रित झाला. आता आमच्या दोघांचंही लग्न झालं आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं तू किसिंग सीन दिलास तुझा नवरा तुला काही बोलला नाही. त्यावर मी एकच सांगेन, माझं क्षेत्र काय आहे, हे माझ्या नवऱ्याला माहित आहे. त्यामुळे इथे भूमिकेची गरज म्हणून हे सगळं करावं लागतं. याची त्याला पूर्ण कल्पना आहे.” (Entertainment News)

Rasika Sunil And Suyog Gorhe Fakat Film Experience
Zara Hatke Zara Bachke Promotion At Rajasthan: भाजी - भाकर आणि राजस्थानी लोकांचं ढीगभर प्रेम, विकी - साराचा 'जरा हटके' Video Viral

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित ‘फकाट’ या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका असून हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com