Ranveer Singh : रणवीर सिंहच्या न्यूड फोटोचे अर्जुन कपूरने केले समर्थन, म्हणाला काही लोकांचे ट्रोल करणे...

रणवीरने नुकतेच एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे, ज्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.
Ranveer Singh and Arjun kapoor
Ranveer Singh and Arjun kapoorSaam Tv

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) सध्या त्याच्या लेटेस्ट न्यूड फोटोशूटमुळे तुफान चर्चेत आहे. रणवीरने नुकतेच एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे, ज्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. बॉलिवूडच्या 'सिंबा'चा हा अवतार त्याच्या अनेक चाहत्यांना आवडला नसल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर विविध मिमीस् तयार होत आहेत. ट्रोलर्ससोबतच आता बॉलिवूड सेलिब्रिटीही रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया देत आहेत. अलीकडेच, रणवीरचा चांगला मित्र अर्जुन कपूरने(Arjun Kapoor) उघडपणे त्याच्या मित्राला पाठिंबा दिला. तो मित्रासाठी असे काही बोलला, ज्यानंतर तुम्ही पण म्हणाल मित्र असावा तर असा

Ranveer Singh and Arjun kapoor
Kaun Banega Crorepati 14 : करोडपती होण्यासाठी तयार आहात? या दिवशी होणार अमिताभ बच्चन यांच्या शो प्रीमियर

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्या मैत्रीबद्दल बॉलिवूड इडस्ट्रीमध्ये सर्वांनाच माहिती आहे. दोघे खूप चांगले मित्र आहेत आणि अनेकदा एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात. करण जोहरच्या शोमध्ये आल्यानंतरही एका टास्कदरम्यान रणवीरने अर्जुनला फोन केला होता. अलीकडे,अर्जुनने एक व्हिलन रिटर्न्सच्या प्रमोशनदरम्यान रणवीरच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली.

Ranveer Singh and Arjun kapoor
ananya movie review : महाराष्ट्राची क्रश असलेल्या हृता दुर्गुळेचा स्वप्नपूर्ती करायला शिकवणारा 'अनन्या' चित्रपट प्रदर्शित

अर्जुन कपूरला विचारण्यात आले की, रणवीर सिंगचे फोटोशूटवर तुझी काय प्रतिक्रिया आहे? त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, 'मला जेवढे माहित आहे, रणवीर सिंगमध्ये कोणताही दिखावा करत नाही. तुम्ही ११-१२ वर्षांपासून रणवीरला पाहत आहात. तो जे काही करतो तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. त्याने जे काही केले ते त्याची निवड आहे, त्याला जे सोयीस्कर वाटते तेच तो करतो आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. आपले स्वतःचे मत असणे चांगले आहे. पण मला असे वाटते की ट्रोलर्सकडे लक्ष देऊ नये, कारण काही लोकांचे ट्रोल करणे हे कामच असते.पण तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करायला हवे'.

याआधी स्वरा भास्करने रणवीर सिंगला सपोर्ट करत ट्विट केले होते. त्यांनी लिहिले की, 'भारतात अन्याय आणि अत्याचाराची प्रकरणे रोज समोर येतात, पण आमची नाराजी रणवीर सिंगच्या छायाचित्रांवरून हटत नाही. मला असे म्हणायचे आहे की तुम्हाला ते आवडत नसेल तर पाहू नका, परंतु तुमचे मत आमच्यावर लादू नका. हा नैतिक मुद्दा नाही!'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com