"कायम तरुण दिसण्यासाठी मी पॉट्टी देखील खाईन"; किम कदर्शियाच्या विधानानंतर सोशल मीडियावर खळबळ

किम कदर्शिया हिने केलेल्या चिरकाल तरुण राहण्यावरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
"कायम तरुण दिसण्यासाठी मी पॉट्टी देखील खाईन"; किम कदर्शियाच्या विधानानंतर सोशल मीडियावर खळबळ
Kim Kardashian Saam Tv

मुंबई : प्रत्येकाला कायम तरुण दिसावं असं वाटतं. त्यासाठी अनेक जण विशिष्ट आहाराच्या पथ्याचे (Diet) पालन करतात. तर काही नियमितपणे व्यायाम करतात. मात्र, प्रसिद्ध रिअॅलिटी शो (Reality show) स्टार किम कदर्शिया (Kim Kardashian) हिनं कायम तरुण दिसण्यावरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर (Social Media) टीकेची झोड उठवली आहे. (Kim Kardashian controversial statement )

हे देखील पाहा -

किम कदर्शियाने काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत 'तू तरूण दिसण्यासाठी काय करू शकते ?, असा सवाल किमला केला. त्यावर प्रश्नावर किमनं विचार न करता पटकन उत्तर दिलं. किम म्हणाली, 'तुम्ही मला कायम तरुण दिसायचं असेल तर त्यासाठी रोज तुला पॉट्टी खावी लागेल तर त्यासाठीही माझी तयारी आहे.' किमच्या या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर तिचे चाहते आणि नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

Kim Kardashian
आता तर हद्दच पार! Urfi Javed ने परिधान केला पोत्याच्या ड्रेस... (Video)

किमने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तिच्या विधानानंतर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तिच्या विधानावर एक युजर म्हणाला , 'किमचं डोक फिरलं आहे'. तर दुसरा युजर म्हणाला की, 'मला असं वाटतं की हिनं आधीही हे कृत्य केलं असावं'. किमचा एक चाहता म्हणाला, 'किम आम्ही तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. परंतु तू असं विधान का केलं ? '. दरम्यान, सध्या किम कदर्शिया कॉमेडियन पीट डेविडसन याला डेट करत आहे. या प्रकरणामुळे फार चर्चेत आहे. या प्रकरणावर किम म्हटली, 'मी पीटसोबत आनंदी आहे. मला आनंद आणि शांती हवी होती, ते सारं मला मिळालं आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com