
मुंबई: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली(Virat Kohli) इंडस्ट्रीतील पॅावर कपलपैकी एक मानले जातात. दोघेही आपापल्या क्षेत्रात मोठी झेप घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही कपल कायम सक्रिय असते. विराट आणि अनुष्का दोघे अनेकदा कपल गोल देत असतात. लवकरच हे कपल एका नव्या अंदाजात दिसणार आहे. क्रिकेटच्या रणांगणावरील रनमशीन म्हणून ओळख असलेला विराट आता पत्नी अनुष्कासोबत नव्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान अनुष्काने याबाबतची माहिती दिली आहे. नुकताच अनुष्काने सोशल मीडियावर विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती विराट कोहलीसोबत हसताना दिसते आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये अनुष्काने, मला क्यूट मुलासोबत बॅण्ड सुरू करायचा होता, असे म्हटले आहे. फोटोमध्ये विराट आणि अनुष्का रोमँटिक मूडमध्ये दिसतायेत. दोघांनी ट्विनीग केला आहे. फोटोमध्ये त्यांनी एकसारखाच जॅकेट घातला आहे. दोघांच्या या झलकबद्दल चाहत्यांनाही उत्सुकता आहे. त्याच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अनुष्का शर्मा लवकरच भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटासाठी ती इंग्लंडमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेणार आहे. या चित्रपटासाठी अनुष्का प्रंचड मेहनत घेत आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर रीलीज झाला आणि अनुष्काचा फर्स्ट लूक समोर आला. ज्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनुष्काचा 'चकडा एक्सप्रेस' चित्रपट २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.