'मी वसंतराव' चित्रपटाला रेड कार्पेट...

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 'मी वसंतराव' हा चित्रपट इफिच्या इंडियन पॅनोरमा बरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठीही भारतातून निवड झालेला सिनेमा आहे.
'मी वसंतराव' चित्रपटाला रेड कार्पेट...
'मी वसंतराव' चित्रपटाला रेड कार्पेट...Saam Tv

पणजी,गोवा: आपल्या अलौकिक कर्तबगारीने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला उंचीवर नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. त्यांच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव' (Mee Vasantrao) या चित्रपटाच्या (Marathi Movie) संपूर्ण टीमला आज इफित रेड कार्पेटचा मान देण्यात आला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा चित्रपट इफिच्या (International Film Festival of India) इंडियन पॅनोरमा बरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेला सिनेमा आहे, त्यामुळे मराठी सिनेमा आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारू शकतो का हे पाहावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी सुवर्ण मयूर आणि ८० लाख रुपयांची रोख रक्कमेचं बक्षीस आहे.

हे देखील पहा -

सध्या भारतीय सिनेमांमध्ये बायोपिकची चलती आहे. यात पंडित वसंतराव देशपांडे सारख्या दिग्गज गायकावर चित्रपट बनवणे हे मोठे आणि अवघड टास्क होते. गेली आठ वर्षे या सिनेमावर काम सुरू होते. त्यात कोरोनामुळे काही काळ गेला. प्रसिद्ध दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यात वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि गायक राहुल देशपांडे, (Rahul Deshpande) अनिता दाते, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, चिन्मय मांडलेकर यांनी अभिनय केला असून या चित्रपटाचे आज इफफीत प्रदर्शन झाले, याला रसिकांकडून हाऊसफुल पसंती मिळाली आहे.

'मी वसंतराव' चित्रपटाला रेड कार्पेट...
'मी वसंतराव' चित्रपटाला रेड कार्पेट...अनिल पाटील

इफफी सारखे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या सिनेमाचे प्रदर्शन होणार ही अत्यंत आनंददायी बाब आहे. यात गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ ज्या चित्रपटांवर काम केले त्या चित्रपटाचे प्रदर्शन इथे होत असल्याने मी अधिक आनंदी आहे. आता स्पर्धेचे मनावर दडपण असले तरी, ते पण मी एन्जॉय करतोय.

 निपुण धर्माधिकारी, दिग्दर्शक

'मी वसंतराव' चित्रपटाला रेड कार्पेट...
Jersey Trailer : 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; शाहिद म्हणाला...

या चित्रपटाची इफफीत निवड होणे, हीच पंडित वसंतराव देशपांडे यांना मिळालेली आंतरराष्ट्रीय सलामी आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात चोखंदळ रसिकांकडून आता चित्रपटाला चांगली दाद मिळत आहे याचा आनंद वेगळाच आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com