Richa Chaddha: रिचा चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार, बॉयकॉटवरील मौन सोडत सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

अशातच रिचाने मोठी भूमिका घेतली आहे. रिचा चढ्ढाने नुकतच बॉयकॉटवरील मौन सोडलं आहे. याबाबत रिचाने महत्वाची टीपण्णी केली आहे.
Richa Chaddha
Richa Chaddha Saam Tv

मुंबई: अभिनेत्री रिचा चढ्ढा(Actress Richa Chaddha) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत असते. आताही रिचा चढ्ढाची सिनेवर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण रिचा आता लवकरच तिचा बॉयफ्रेंड अलीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच रिचाने मोठी भूमिका घेतली आहे. रिचा चढ्ढाने नुकतच बॉयकॉटवरील मौन सोडलं आहे. याबाबत रिचाने महत्वाची टीपण्णी केली आहे. रिचाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत तिचं मत मांडलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Richa Chaddha
'मैत्री होऊ शकली असती पण..' सोनालीने अमृता खानविलकर सोबतच्या नात्यावर सोडले मौन

बॉलिवूडमधील सिनेमांतील अत्यंत महत्वाचा समजला जाणार ट्रेंड म्हणजे 'बॉयकॉट'.या ट्रेंडमुळे बरेचसे सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले आहेत. यावर रिचाने प्रतिक्रिया दिली आहे. रिचा म्हणाली, "दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करुन मी बाहेरगावी निघाली आहे. सिनेसृष्टीत आपल्याला दररोज कशाप्रकारे शुटिंग करता येईल, याबाबत छोटीशी प्रार्थना केली. येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी पूजा करा. हिंदी सिनेसृष्टीवर जहरी टीका करणाऱ्या लोकांची भूमिका मला आवडली नाहीय. इंडस्ट्रीतील लोकांचे काम हिसकावण्यासाठी अशा बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला आहे,असे मला वाटते.मात्र,काही सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवतात. अशा सिनेमांमुळं कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमा होतो. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंडला जणू काही मोडीत काढलं आहे, असं चित्र निर्माण झालं आहे.लवकरच सर्व काही बदलेल.'

रिचाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटस् केल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही रिचाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. रिचाचा पोस्टवर अली फजलने कोणता इमोजी पोस्ट केला आहे. यावर युजर्सकडून अनेक कमेंट्सही आल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, 'मस्त पोस्ट, अगदी खरोखर बोलली' तसेच दुसरी कमेंट 'आत्ताच्या वास्तवावर तू भूमिका मांडली. सर्वांनीच हा आदर्श घ्यावा.'

Edit By- Chetan Bodke

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com