Richa Chadha Ali Fazal Wedding : ऋचा-अलीच्या लग्नाचे हटके आमंत्रण, माचीस बॉक्स लग्नपत्रिका व्हायरल

ऋचा-अलीची लग्नपत्रिका खूपच अनोखी आहे
Richa Chaddha and Ali Fazal
Richa Chaddha and Ali Fazal Saam TV

मुंबई : अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री ऋचा चढ्ढा(Richa Chadha) आणि अभिनेता अली फजल(Ali Fazal) आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या तारखेनंतर त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाशी संबंधित अपडेट्स समोर आले होते, तर आता त्यांच्या लग्नाचे कार्डही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कपलच्या लग्नात सर्व काही खास आणि वेगळ्या पद्धतीने तयार केले जात आहे. त्यामुळे त्यांची लग्नपत्रिकाही खूपच अनोखी आहे. आगपेटीची रचना असलेल्या या कार्डचे फोटो समोर येताच खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमकथेप्रमाणेच त्यांच्या लग्नाची पत्रिकाही खूप वेगळी आहे.

Richa Chaddha and Ali Fazal
Samantha Ruth Prabhu : घटस्फोटनंतर समंथाला झाला 'हा' आजार... नेमकं खरे काय?

मीडिया रिपोर्टनुसार, अली आणि ऋचाने त्यांच्या खास मित्राकडून हे कार्ड डिझाइन करून घेतले आहे. मॅच बॉक्सवर, एक जोडपे रेट्रो लुकमध्ये दिसत आहे ज्यांचे चेहरे पॉप आर्टच्या मदतीने डिझाइन केले आहे, तर या कार्डवर ऋचा आणि अली सायकलवर बसून एकमेकांकडे पाहत आहेत. हे संपूर्ण मुखपृष्ठ ९० च्या दशकाची आठवण करून देणारे आहे. या मॅच बॉक्सवर कपल मॅचेस असे लिहिले आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, या कपलच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरू आहे.

Richa Chaddha and Ali Fazal
Katrina Post : कतरिना कैफचा पती विकी कौशलसोबत रोमँटिक मूव्हमेंट, फोटो व्हायरल

दुसरीकडे, जिथे लग्नपत्रिका खूप अनोखी आहे, तिथे रिचा तिच्या लग्नातही पारंपारिक दागिने परिधान करताना दिसणार आहे, तेही राजस्थानी शैलीत. बिकानेर येथील एका कुटुंबाकडे तिचे दागिने बनवण्याचे काम सोपवण्यात आले असून, हे कुटुंब दागिने बनवण्याचे काम १७५ वर्षांपासून करत असून राजस्थानी संस्कृती जपत आहेत. ऋचा तिच्या लग्नात कोणतीही कसर सोडणार नाही. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबरला दोघेही मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com