Rinku Rajguru Video: आर्ची आली आर्ची...! ट्रॅक्टर, बुलेट अन् आता कार; मराठमोळा साजशृंगार करून रिंकू राजगुरू चालली कुठं?

Rinku Rajguru Share Video: रिंकूने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Rinku Rajguru Long Drive Video
Rinku Rajguru Long Drive VideoSaam TV

Rinku Rajguru Share Video While Driving Car: सैराट या चित्रपटातून पदार्पण करण्याऱ्या रिंकूने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटांसह तिने ओटीटीवर देखील काम केले आहे. रिंकू सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि तेथे शेअर करत असलेल्या फोटोंमुळे ती चर्चेत असते.

रिंकूने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिंकूने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, 'चला लाँग ड्राइव्हला जाऊ, कुठे थांबायचे माहीत नसताना.' (Latest Entertainment News)

Rinku Rajguru Long Drive Video
K-Pop Singer Death: के-पॉप स्टार गायिकेची वयाच्या २९ व्य वर्षी निधन

रिंकू या व्हिडिओमध्ये मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. काठाची साडी, नाकात नाथ, गळ्यात सोन्याचा हार आणि कानात डूल तर हातात हिरव्या बांगड्या असा रिंकूचा संपूर्ण लूक आहे.

रिंकूने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण रिंकीच्या ड्रायविंगचे कौतुक करत आहेत. तर एका नेटकाऱ्याने, सैराट मधी ट्रॅक्टर चालवायची बुलेट पण चालवायची आणि आत्ता फोर व्हिलर वा आर्चे, अशी कमेंट केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला सीटबेल्ट वापरण्याचा सल्ला देखील दिला आहे.

रिंकू खिल्लार या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये रिंकू आणि ललित प्रभाकर पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. तर मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

रिंकूच्या सैराट या चित्रपटाला यावर्षी ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. तिचा सहकलाकार आकाश ठोसरने फोटो पोस्ट करत रिंकूला टॅग केलं होत. मराठीबरोबरच रिंकू हिंदीमध्येही सक्रिय आहे. तिने ओटीटी देखील पदार्पण केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com