Indian Idol 13 Winner: विराट कोहली ज्याचा फॅन तो जिंकला, ७ महिन्यानंतर अखेर इंडियन आयडल १३ला विजेता मिळाला

Rishi Singh wins Indian Idol 13: ऑडिशनमध्ये ऋषीने 'मेरा पहला पहला प्यार..' हे गाणे गायले होते.
RISHI SINGH winner of singing reality show Indian idol
RISHI SINGH winner of singing reality show Indian idolInstagram @rishisinghmusic

Rishi Singh Won Indian Idol 13: इंडियन आयडल १३ चा महाअंतिम सोहळा काल पार पडला. अयोध्याचा ऋषी सिंग या पर्वाचा विजेता ठरला. ७ महिने चाललेल्या या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. त्या सर्वांनी ऋषीचे कौतुक केले होते. इंडियन आयडल १३ चा विजेता ऋषी सिंगल ट्रॉफयसहा २५ लाख आणि ब्रँड न्यू ब्रेझ्झा ही कार मिळाली आहे.

देबोस्मिता रॉय ही उपविजेता ठरली. ऋषी आणि देबोस्मिता व्यतिरिक्त टॉप ६ मध्ये सोनाक्षी कर, चिराग कोटवाल, शिवम सिंह, बिदीपता चक्रवर्ती हे स्पर्धक होते. ऋषीने ऑडिशनलाच परीक्षकांना इम्प्रेस केले आहे. ऋषी क्रेझ इतकी आहे होती की, विराट कोहली देखील त्याचा फॅन झाला आणि त्याला फॉलो करू लागला.

RISHI SINGH winner of singing reality show Indian idol
Varun Dhawan Viral Video: वरुणने सर्वांसमोर का केलं हॉलिवूड अभिनेत्री गिगीला किस?, अभिनेत्याच्या उत्तराने नेटकरी पार गार

ऑडिशनमध्ये ऋषीने 'मेरा पहला पहला प्यार..' हे गाणे गायले होते. त्याने ऑडिशनमध्ये गायलेले हे गाणे व्हायरल झाले होते. विराट कोहली जेव्हा त्याचे हे गाणे पहिले तेव्हा त्याने ऋषीला पर्सनल मेसेज केला. त्याच्या आवाजाचे कौतुक केले. एवढंच नाही तर त्याला फॉलो देखील केले.

इंडियन आयडॉल शो जिंकल्याबद्दल ऋषीने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तेव्हा तो म्हणाला, हा शो मी जिंकला आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. हा मोठा सन्मान आहे. मी संपूर्ण टीम, चॅनल आणि जज यांचे आभार मानू इच्छितो. मी आता आणखी मेहनत करेन.'

ऋषीने इंडियन आयडल जिंकले आहे, आता त्याचे आणखी एक स्वप्न आहे, जे तो पूर्ण करणार आहे. गायनातील दिग्गज अरिजित सिंग यांना तो आपला आदर्श मानतो. ऋषी अरिजीतचा मोठा चाहता आहे आणि त्याला भेटण्याची त्याची उच्च इच्छा आहे. असे ऋषीने सांगितले.

याशिवाय ऋषी म्हणाले की, त्याला एवढी प्रगती करायची आहे की एक दिवस तो या शोमध्ये (इंडियन आयडॉल) जज म्हणून परत येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com