
मुंबई: एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाला ऑस्कर मिळण्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. व्हरायटी मासिकाने दिलेल्या माहिती प्रमाणे, विविध विभागांमध्ये नावे जाहीर करण्यात आली आहेत. आरआरआर चित्रपटाला दोन विभागात ऑस्कर मिळण्याची शक्यता आहे.
व्हरायटीने वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे आरआरआर चित्रपटात 'दोस्ती' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत त्याला नामांकन प्राप्त झाले आहे. एम.एम.कीरवानी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे चित्रपटातील राम चरण आणि जूनियर एनटीआर यांच्या मैत्रीवर आधारित आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स मधील 'दिस इज अ लाइफ', मॅव्हरिकचे 'होली मु हँड' आणि टर्निंग रेडचे 'नोबडी लाइक यू' सारख्या गाण्यांचाही समावेश आहे.
सँटियागो मित्रे दिग्दर्शित 'अर्जेंटिना १९८५', अलेजांद्रो गोन्झालेझ इनारितूचा 'बार्डो', लुकास धोंट्स 'क्लोज' तसेच अली अब्बासीचा 'होली स्पायडर' यांचीही नावे चर्चेत आहेत. आरआरआरला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’साठी नामांकन मिळण्याचा अंदाज बांधला जात आहे.
जगभरातील प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. परदेशातील प्रेक्षकही आरआरआर चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे या चित्रपटाने परदेशात २०८.०२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या चित्रपटाला हॉलिवूडमधील अनेक कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ५५० कोटींमध्ये बनलेल्या एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ज्युनियर एनटीआर आणि राम चरणची जोडी लोकांना इतकी आवडली की चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ९०३.६८ कोटी रुपये कमावले. म्हणजेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण १ हजार १११.७ कोटींची कमाई केली. १ हजार कोटींचा टप्पा पार करणारा एसएस राजामौली यांचा हा दुसरा चित्रपट आहे.
Edit By- Chetan Bodke
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.