Isha Talwar Injured: मिर्झापूर फेम अभिनेत्रीचा सेटवर अपघात; फायरिंग सीनदरम्यान डोळ्याला झाली गंभीर इजा...

‘मिर्झापूर’ फेम इशा तलवारला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे.
Isha Talwar Eyes Injured
Isha Talwar Eyes InjuredInstagram

Isha Talwar Eyes Injured: ओटीटी विश्वात ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजने ओटीटीवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वेबसीरिजमध्ये माधुरी भाभीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री इशा तलवारचा (Actress Isha Talwar) शूटिंग दरम्यान अपघात (Injured) झाला आहे. चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिने दुर्घटना झाल्याची माहिती दिली आहे.

Isha Talwar Eyes Injured
Hey Pawlay Dev Majha Malhari Song Maharashtra Shaheer Released: १५ दिवसांनी 'महाराष्ट्र शाहीर'मधील 'हे पावलायं देव माझा मल्हारी' नवं गाणं प्रदर्शित

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सास बहू और फ्लेमिंगो’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. या दुर्घटनेमुळे तिच्या डोळ्याला जबर मार लागला. तिच्या डोळ्याला जबर मार लागल्याची माहिती अभिनेत्रीने खुद्द सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत दिली आहे. सोशल मीडियाच्या स्टोरीमध्ये तिने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक तिचा साधा फोटो आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिचा एक डोळा पट्टीने झाकलेला पहायला मिळतोय.

आगामी चित्रपटाचे ॲक्शन सीन्स चित्रित करताना तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. शूटिंग दरम्यान सेटवर स्क्विब मशीनचा वापर करण्यात आला होता. तो सीन शूट करताना त्या मशीनमुळे तिच्या डोळ्याला दुखापत झाली.

सोशल मीडियावर पोस्ट करताना अभिनेत्री म्हणते, “सेटवर खूपच अंधार होता आणि स्क्विब्स थेट माझ्या डोळ्याला लागली. त्यामुळेच माझा डोळा सूजला आणि काही वेळानंतर मी तो डोळाच उघडू शकत नव्हते. दुखापत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच सहकलाकार दीपक डोब्रियाल यांनी मला डॉक्टरकडे नेलं. त्यानंतरही तीन दिवस मी त्या डोळ्याची नीट उघडझाप करू शकत नव्हती. तीन दिवसांनंतर मी सेटवर परतले.” असं इशाने सांगितलं.

Isha Talwar Eyes Injured
Ashish Shelar On Marathi Natya Parishad Election: नाट्यपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपलं पॅनलला शेलारांचा पाठिंबा...

‘सास बहू और फ्लेमिंगो’ चित्रपटात इशाने अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या सुनेची भूमिका साकारली असून या चित्रपटात तिचे बरेच ॲक्शन सीन्स आहेत. सेटवर शूटिंग दरम्यान डोळ्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला उजेडात जाण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या नियमांचे पालन करत तीन दिवस अंधारातच राहावं लागलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी इशाला ॲक्शन सीन्ससाठी बॉडी डबलचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र इशाला चित्रपटातील सीन्स स्वत: शूट करायचे होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com