Indian Idol Marathi: पनवेलचा सागर म्हात्रे ठरला पहिला 'मराठी इंडियन आयडॉल'

Indian Idol Marathi Winner Is Sagar Mhatre: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे पेशाने इंजिनियर आहे.
Sagar Mhatre From Panvel is Become First Marathi Indian Idol
Sagar Mhatre From Panvel is Become First Marathi Indian IdolInstagram/@sagarmhatreofficial

मुंबई : 'हिंदी इंडियन आयडॉल'ने कलाविश्वाला आजवर अनेक नवोदित गायक तसेच गायिका दिल्या. त्यानंतर हा शो मराठीत उतरला. मराठीत सुद्धा या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात घर केलं. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा सोनी मराठीवर (Sony Marathi) पार पडला. यामध्ये पनवेलचा (Panvel) सागर म्हात्रे (Sagar Mhatre) विजयी ठरला आहे. राज्यभरातील अनेक स्पर्धकांनी 'इंडियन आयडॉल मराठी'त (Indian Idol Marathi) सहभाग नोंदविला होता. यामध्ये सागरने बाजी मारली आहे. (Sagar Mhatre From Panvel is Become First Marathi Indian Idol)

हे देखील पाहा -

इंडियन आयडॉल कार्यक्रमानं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल (Ajay-Atul) यांनी परीक्षक म्हणून जबादारी सांभाळली. इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक दाखल झाले होते. त्यांच्यात सागरनं बाजी मारत पहिल्या पर्वाचं विजेतेपद मिळवलं आहे.

कोण आहे सागर म्हात्रे? (Singer Sagar Mhatre From Panvel)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे पेशाने इंजिनियर आहे. इंजिनियर असला तरीही त्याच्या सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सागरला 'गाडीवान दादा' असं टोपणनाव पडलं होतं. स्पर्धेत टॉप १४ स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गायली. मेहेनत, जिद्द, रियाज या जोरावर परिक्षकांची वाह... वाह, मिळवत सागरने तब्बल ८ 'झिंगाट परफॉर्मन्स' मिळवले.

Sagar Mhatre From Panvel is Become First Marathi Indian Idol
'Marriage.. Marriage.. Marriage'; लग्नपत्रिकेवरच अनोख्या अंदाजात छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग!

सागरने या स्पर्धेमध्ये हिंदी, मराठी सर्व प्रकारची गाणी गायली. इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांनीही सागरच्या गाण्याचं भरभरून कौतुक केलं. आता 'इंडियन आयडॉल मराठी' च्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com