Sahela Re: 'सहेला रे' घेऊन येत आहे एक मखमली नातं; चित्रपट १ऑक्टोबरला होणार रिलीज

मृणाल कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे.
Sahela Re Movie
Sahela Re MovieInstagram @mrinalmrinal2

मुंबई : चित्रपट आणि मालिका अभिनेत्री, दिग्दर्शक मृणाल कुलकर्णीने (Mrinal Kulkarni) मनोरंजन विश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन यांचा वेगळेपणा नेहमीच त्यांनी चित्रपटाच्या कथातून सादर केला आहे. नुकताच मृणाल कुलकर्णीने सोशल मीडियावर( Social Media) एक पोस्ट शेअर केली आहे,जी सध्या चर्चेत आहे.

Sahela Re Movie
36 Gunn : 'लग्न करताय! असायला पाहिजेत हे गुण' सांगणाऱ्या संतोष जुवेकरच्या'३६ गुण' चित्रपटाचे पोस्टर आऊट

मृणाल कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. सहेला रे.... एक मखमली नातं १ ऑक्टोबर पासून फक्त प्लॅनेट मराठी ओटीटीवर !असा भन्नाट कॅप्शन दिला आहे.

Sahela Re Movie
'फॅमिलीचा चित्रपट पाहा फॅमिलीसह' श्रेयस तळपदेच्या 'आपडी थापडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबचित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोशल मीडियावर ' सहेला रे'चे पोस्टर रिलीज झाले असून चित्रपटाची कथा नातेसंबधावर आधारित आहे.

दुबईमध्ये 'एक्स्पो २०२० दुबई' या सोहळ्यात 'प्लॅनेट मराठी'च्या 'सहेला रे' या चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले होते. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. आता चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com