Sairaj Kendre New Video: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ नंतर साईराजचा नवा रील, एका दिवसांत ६६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज

Sairaj Kendre New Reel: उद्या राज्यभरामध्ये श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्याचपूर्वी साईराज छोटा कान्हाच्या रुपामध्ये नवा रील घेऊन आला आहे. '
Sairaj Kendre New Video
Sairaj Kendre New VideoSaam tv

Amchya Pappani Ganpati Anala Video Viral:

'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' या गाण्यावरच्या रिलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील चिमुकल्या साईराजच्या एक्स्प्रेशनने तर साऱ्यांची मनं जिंकली आहेत. सध्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये दिसतोय तो म्हणजे साईराजचा हाच व्हिडिओ. साईराजच्या या व्हिडिओला अवघ्या काही दिवसांमध्येच ३६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. सध्या साईराजचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. या व्हिडिओने साईराज रातोरात स्टार झाला. गणेशोत्सवाच्या आधीच साईराजचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे. अशामध्ये आता साईराज नवा रील व्हिडिओ घेऊन आला आहे.

Sairaj Kendre New Video
Boycott Jawan Movie: रिलीजच्या एक दिवसआधीच 'किंग खान'ला मोठा झटका, ट्रेंड होतोय बॉयकॉट जवान; नेमकं कारण काय?

उद्या राज्यभरामध्ये श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्याचपूर्वी साईराज छोटा कान्हाच्या रुपामध्ये नवा रील घेऊन आला आहे. 'नजरेचा मारू नको बाण ग ...माझा जाईल प्राण ग' या गाण्यावर साईराजने रील तयार केले आहे. त्याच्या आधीच्या 'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' या रीलप्रमाणेच त्याने मन जिंकणारे एक्स्प्रेसशन दिले आहेत. हा चिमुकला गोविंदा सर्वांना प्रचंड आवडत आहे.

Sairaj Kendre New Video
Ankita Lokhande Interview: मी 3 महिने घरीच गेले नव्हते... पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने सांगितले 14 वर्षापुर्वीची आठवण

या व्हिडिओमध्ये साईराजने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. गोविंदा डोक्याला बांधतात तशी केशरी रंगाची रिबीन आणि त्यावर मोरपीस आणि कपाळी टिळा असा लूक त्याने केला आहे. या गाण्यातून साईराजच्या डोळ्यांचे एक्स्प्रेशन तर खतरनाक आहेत. त्यात त्याने ज्या पद्धतीने बाण मारण्याची स्टाईल केली आहे ती देखील जबरदस्त आहे. साईराजच्या या नजरेचा बाण थेट लोकांच्या काळजाला मध्येच घुसला आहे.

Sairaj Kendre New Video
Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये दहीहंडीचा जल्लोष; जयदीप फोडणार शिर्के पाटीलांची मानाची हंडी

साईराजच्या या नव्या व्हिडिओला अवघ्या १ दिवसांमध्ये ६६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७ लाख ५७ हजार लाईक्स मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट करत 'तू जर असेच रिल्स बनवत राहिलास तर, बाकिचे स्टार घरी बसतील माश्या मारीत...मस्त बाळा', अशी कमेंट केली आहे. तर काहींनी त्याच्या स्माईलचे कौतुक केले आहे. तर आणखी एका युजरने, बाळा खरोखर खूप भारी अ‍ॅक्टिंक करतोय रे. खूप मोठा होशिल एक दिवस', अशी कमेंट केली आहे.

Sairaj Kendre New Video
Bigg Boss 17 Promo: सलमान खानने शूट केला 'बिग बॉस-१७' चा प्रोमा, सेटवरून लीक झालेला फोटो व्हायरल

साईराज केंद्रे या चिमुकल्याचे हे रील्स गणेश केंद्रे या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. अवघ्या ४ वर्षांचा असलेला साईराज आज सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहे. हा चिमुकला बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी या गावातील रहिवासी आहे. बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडीमधील माऊली अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये साईराज शिकतो. साईराजने शाळेच्या गणवेशात व्हिडिओ शूट केल्यामुळे त्याच्या शाळेचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून साईराज हा स्टारच झाला आहे. (Viral Video)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com