Salman Khan: सलमानची शेजाऱ्यांविरोधात तक्रार; बदनामी केल्याचा आरोप

मात्र, या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे सलमान खानला हा मोठा झटका म्हणावा लागेल.
Salman Khan: सलमानची शेजाऱ्यांविरोधात तक्रार; बदनामी केल्याचा आरोप
Salman KhanSaam Tv

मुंबई - अभिनेता सलमान खानने (Salman Khan) त्याच्या शेजाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. सलमानच्या पनवेलमधल्या (Panvel) फार्म हाऊसच्या (Farm House) शेजारी मालाडमधले कक्कड यांचे देखील फार्म हाऊस आहे. कक्कड यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप सलमानने केला आहे. सलमानने तक्रार केलेलं हे प्रकरण कोर्टात गेलं. मुंबईच्या दिवाणी न्यायालयात (Civil Court of Mumbai) ही सुनावणी झाली. मात्र, या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे सलमान खानला हा मोठा झटका म्हणावा लागेल. (Salman khan complaint against neighbors)

हे देखील पहा -

काय आहे सलमानची तक्रार

सलमानने आपल्या शेजाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. सलमानने शेजारी राहणाऱ्या कक्कड यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप केला आहे.काही दिवसांपूर्वी कक्कड यांनी युट्यूबवर एक मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी आपल्याबद्दल खोटी माहिती दिली. कक्कड यांच्या या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचं सलमानचं म्हणणं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com