Salman Bulletproof Car : सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार , किंमत ऐकून बसेल धक्का !

सलमान खानने त्याची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एक नवीन बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे.
Salman Khan Image
Salman Khan ImageSaam Tv

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानला (Salman Khan) हल्लीच मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे खान कुटुंबीयांना धक्का बसल्याचे दिसत आहे. सलमान खानला नुकतेच बंदूक बाळगण्याचा परवाना(Gun License) मिळाला आहे. त्याच्या कुटुंबीयांना लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सुपरस्टारने मदतीसाठी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली, ज्यामुळे त्याला बंदुकीचा परवाना मिळाला आहे. मात्र आता असे म्हटले जाते की सलमान खानने त्याची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एक नवीन बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे.

Salman Khan Image
Koffee With Karan 7 : आमिर-करीना 'शो'मध्ये येण्यापूर्वी करण जोहरने मध्यरात्री लिहिले दोन सीक्रेट नोटस् !

माहितीनुसार, अलीकडेच मुंबई विमानतळवर सलमान खान नवीन टोयोटा लँड क्रूझर कारमधून येताना दिसला होता. या कारची किंमत सुमारे १.५० कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. ही कार पूर्णपणे बुलेटप्रूफ असण्याची शक्यता आहे. सुपरस्टार सलमान विमानतळावर येतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. कारण तो यावेळी त्याच्या नवीन कारमधून विमानतळावर पोहोचला होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमानच्या सुरक्षेसाठी त्याच्यासोबत सुरक्षा कर्मचाऱ्यांची गर्दी होती. व्हिडिओमध्ये सलमान खानही खूप गंभीर दिसत होता.

Salman Khan Image
'ही तर हुबेहूब दयाबेनचं'; व्हायरल व्हिडीओवर तारक मेहता निर्मातेही 'कन्फ्यूज'

काही काळापूर्वी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही धमकी मिळाल्यानंतर, सलमान खानने २२ जुलै रोजी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्र ठेवण्याचा परवाना मागितला. परवाना मिळाल्यानंतर सलमानने त्याच्या सुरक्षा व्यवस्थेतही अनेक बदल केले आहेत.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचा आगामी चित्रपट 'भाईजान' आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत पूजा हेगडे मुख्य पहिल्यांदाच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून बिग बॉस फेम शहनाज गिलही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सलमान खानचा हा चित्रपट यावर्षी ३० डिसेंबरला रिलीज होणार आहे. याशिवाय सलमानचा 'टायगर ३' देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com