
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान अडचणीत सापडली आहे. ५ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात जरीन विरोधात अटक वाॅरंट काढण्यात आले आहे. २०१८ सालचे हे प्रकरण असून काली पूजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. कोलकाता येथील नारकेलदंगा येथे जरीन खान विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली होती. आता सियालदह कोर्टाने जरीन विरोधात अटक वाॅरंट जारी केले आहे.
2018 मध्ये 6 कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीन खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर 24 परगणा येथील 6 काली पूजेच्या कार्यक्रमांना जरीन खान उपस्थित न राहिल्याने तिच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती.
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने नारकेलदंगा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नारकेलदंगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केले. 'हे प्रकरण समोर आल्यानंतर आम्ही या प्रकरणी जरीन खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.' असे पोलिसांनी म्हटले आहे.
या प्रकरणी या इव्हेंट कंपनीने जरीन खानवर गंभीर आरोप केले आहेत. या कंपनीने सांगितले की, जरीनने आम्हला अंडरवर्ल्डची धमकी दिली आहे. यावर अभिनेत्री जरीन खानची अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. (Latest Entertainment News)
सलमान खानचा वरदहस्त असलेल्यांपैकी जरीन खान एक आहे. सलमान खानच्या चित्रपटातून जरीन खानने डेब्यू केला होता. २०१० मध्ये आलेल्या 'वीर' चित्रपटामध्ये जरीन आणि सलमान एकत्र दिसले होते.
त्यानंतर जरीनची तुलना कतरिना कैफशी झाली. अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरीन म्हणाली की, 'कतरिनाशी माझी तुलना होत आहे हे खूप चांगलं आहे. ती माझी आवडती अभिनेत्री आहे. परंतु या तुलनेमुळे मला माझे स्किल दाखविण्याची संधी मिळत नाही.'
जरीन खान रेडी, हाऊसफुल २, हेट स्टोरी ३, अक्सर २ आणि चाणक्य या चित्रपटांमध्ये दिसली होती. तसेच २०२१ साली आलेल्या 'हम भी अकेले तुम भी अकेले'मध्ये देखील जरीनने काम केले होते. (Movie)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.