सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासा
सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासाSaam Tv

सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासा

या गेममधे हिट अँड रन प्रकरणाचाही समावेश

मुंबई - प्ले स्टोर Play Store वरील ‘सेलमोन भोई’ या गेमवर मुंबई सिव्हिल कोर्टाने Mumbai Civil Court तात्काळ बंदी घातली आहे. तरुणांमध्ये या गेमबद्दल Game बरीच चर्चा आहे. सेलमोन भोई हा गेम सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ Hit and Run आणि ‘ब्लॅकबक हंटिंग’ प्रकरणांवर आधारित आहे. यामुळे सलमानने या गेमच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होता. सलमानच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्या अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. या गेममधे हिट अँड रन प्रकरणाचाही समावेश आहे.

अलीकडेच या विषयावर एक मोबाईल गेम सुरू करण्यात आला होता.‘सेलमोन भोई’ असे या गेमचे नाव आहे. या प्रकरणी सलमान मुंबईच्या दिवाणी न्यायालयात पोहोचला आणि त्याने या विरोधात खटला दाखल केला होता. यानंतर कोर्टाने सलमानला दिलासा देत ‘सेलमोन भोई’ या गेमवर तात्पुरती बंदी घातली आहे.

सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासा
भाजपनंतर मनसेने हाती घेतले टाळ..म्‍हणाले ‘उद्धवा अजब तुझे सरकार’

मात्र याबाबद गेमिंग कंपनीने एक दावा केला आहे. हा गेम काल्पनिक आहे. गेमच्या सुरु झाल्यावर ‘सेलमोन भोई’ हे पात्र दारूच्या प्रभावाखाली वाहन चालवताना दिसून येत आहे आणि फक्त या गेममध्ये अॅनिमेटेड पात्र योगायोगाने सलमान खान सारखा दिसते. पण सलमानच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, कंपनीने अभिनेत्याचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला आहे. यासाठी कंपनीने सलमानची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही . आता २० सप्टेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com