
Salman Khan After Injury Latest Post: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अनेकदा त्याच्या चित्रपटातील नव नवे अपडेट्स सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकताच काही दिवसांपुर्वी सलमानचा सेटवर अपघात झाला होता, त्याला गंभीर दुखापत देखील झाली होती. त्यातून त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली असून त्याने आपल्या चाहत्यांसोबत खास फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
सलमान खानने सोशल मीडियावर त्याचा एक नवा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक कमालीचा चर्चेत आला आहे. फोटोमध्ये सलमान खानने निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून बोटीवर जॉगर्स घालून एक फोटोशूट केलंय. शेअर केलेल्या फोटोत बॅकग्राऊंडला नदीचे सुंदर विहंगम दृश्यही दिसत आहे. हा फोटो शेअर करत सलमानने कॅप्शनमध्ये, ‘बोट हो गया’ अशा आशयाचे कॅप्शन दिले.
सलमानच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्या फोटोंवर भाईजानच्या चाहत्यांनी त्याल कमेंट करत म्हणतात, एका यूजर म्हणतो, 'एक नंबर भाईजान'. तर एका युजरने तर थेट प्रेम करतो अशीच कमेंट केली. तर दुसरा चाहता म्हणतो, 'टायगर परत आला आहे'. सोशल मीडियावर सलमानच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे.
सलमान खानने गेल्या काही दिवसांपुर्वी ‘टायगर ३’ च्या सेटवर झालेल्या अपघाताची माहिती त्याने दिली होती. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, सलमानच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली असल्याने त्याने पॅच लावत फोटो शेअर केला होता. सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही जगाचे वजन तुमच्या खांद्यावर उचलले आहे, तेव्हा तो म्हणतो की, जगाच सोड पाच किलोचा डंबेल उचलून दाखव. Tiger Zakhmi Hai. #Tiger3 ” अशा आशयाची त्याने पोस्ट शेअर केली.
दरम्यान, ‘टायगर ३’मध्ये सलमानसोबत कतरिना कैफ सुद्धा दिसणार आहे. ‘टायगर’ फ्रँचायझीतील हा सलमानचा तिसरा चित्रपट असून यावेळी सलमान आणि शाहरुख खान याच्यात आमने-सामने येणार आहेत. सलमान आणि शाहरुखमध्ये दमदार ॲक्शन सीन्स आपल्याला या चित्रपट पाहायला मिळणार आहे. या सीनसाठी आदित्य चोप्राने वेगळा जबरदस्त सेट बनवला आहे. हा सेट तयार करण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
काल बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान मुंबईतील वांद्र्यातील कार्टर रोडवर सलमान १९ मजली अलिशान हॉटेल बांधणार असल्याची सध्या चर्चा सुरू आगे. भाईजानच्या या १९ मजली हॉटेलबद्दल सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान वांद्र्याच्या कार्टर रोडवर १९ मजली इमारतीचे हॉटेल बांधणार असून त्याचे हे नवीन हॉटेल सी-फेसिंग असणार आहे. मुंबई महानगरपालिकेने त्याच्या या हॉटेलच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचंही मीडिया रिपोर्टमध्ये नमूद केलंय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.