Salman Khan Snake Bite | शुटींगमधून ब्रेक घेऊन सलमान फार्महाऊसवर का गेला?

प्रश्न हा उपस्थित होतो की, सलमान खान हा शुटींग आणि सर्व कामं सोडून पनवेलच्या फार्म हाऊसवर का गेला होता.
Salman Khan Snake Bite | शुटींगमधून ब्रेक घेऊन सलमान फार्महाऊसवर का गेला?
सलमान खान Saam Tv

मुंबई : सुल्तान सलमान खानच्या (Salman Khan) सर्व चाहत्यांचा मोठा धक्का बसला जेव्हा सलमानला सर्पदंश (Snake Bite) झाल्याची बातमी पुढे आली. सलमान खान आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर (Panvel Farmhouse) असताना त्याच्यासोबत ही घटना घडली. तिथे एका सापाने चावलं. या घटनेनंतर सलमानला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. साप (Snake) एवढा विषारी नसल्याने त्याला रूगणाल्यातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. (Salman Khan Snake Bite know why Salman Khan goes to Panvel farmhouse)

कामातून ब्रेक घेऊन सलमान फार्महाऊसवर का गेला?

पण, प्रश्न हा उपस्थित होतो की सलमान खान (Salman Khan) हा शुटींग आणि सर्व कामं सोडून पनवेलच्या फार्म हाऊसवर का गेला होता. जर तुम्ही सलमान खानचे फॅन असाल तर तुम्हाला माहितीच आहे की सलमानचे आवडते ठिकाण पनवेलचं फार्म हाऊस आहे. सलमानने अनेकदा याबाबत सांगितले आहे.

हेही वाचा -

सलमान खान
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चावला साप

25 डिसेंबरला नाताळ आणि 27 डिसेंबरला सलमान खानचा 56 वा वाढदिवस आहे. त्यामुळे तो सेलिब्रेट करण्यासाठी त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर गेला होता. सलमान खान दरवर्षी त्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कोरोनाचा वाढता धोका पाहता यंदा सलमानने त्याचा वाढदिवस कमी लोकांमध्ये साजरा करण्याचं ठरवलं. त्यामुळे तो पनवेलच्या फार्महाऊसवरच त्याचा वाढदिवस साजरा करणारेय. या सेलिब्रेशनमध्ये त्याच्या जवळची मित्रमंडळीच सहभागी होणारे.

वाढदिवसापूर्वी समलानसोबत दुर्घटना

वाढदिवसाच्या एक दिवसापूर्वी सलमान खान आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये होता. मध्यरात्री त्याला सर्पदंश झाला. परंतु, बिनविषारी सापाने चावा घेतल्याने सलमान खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सलमानला मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्याला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. आता अशा परिस्थितीत तो त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे की नाही हे पाहावं लागणार आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.