Salman Khan : जिंकलंस 'भाईजान'!, स्टारडम विसरून जवानांसाठी सलमाननं भाजल्या पोळ्या, फोटो व्हायरल

बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खाननं भारतीय नौदलातील जवानांसोबत आपला वेळ घालवला.
Salman Khan Image
Salman Khan ImageSaam Tv

Salman Khan With Indian Navy | मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा होत आहे. देशातील प्रत्येक नागरिक देशप्रेमाने भारावून गेला आहे. अशात बॉलिवूड सेलिब्रिटीही कुठे मागे नाहीत. बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खाननं (Salman Khan) भारतीय नौदलातील जवानांसोबत आपला वेळ घालवला. त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय नौदलाच्या (Indian Navy) जवानांसह अधिकाऱ्यांसोबतचे त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Salman Khan Image
Ali Fazal-Richa Chadha Wedding : अली फजल-ऋचा चढ्ढा पारंपरिक पद्धतीनं करणार लग्न, पाहुण्यांची यादी, संगीत...असा आहे प्लान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान एखाद्या इव्हेंटमध्ये पोहोचला की तेथील वातावरण आपसुकच बदलून जातं. सलमाननं असंच पुन्हा एकदा आपल्या उपस्थितीनं कार्यक्रमाला चार चाँद लावले. अलीकडेच सलमान एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी विशाखापट्टणममध्ये गेला होता. त्यावेळी त्यानं नौदलाच्या जवानांची भेट घेतली. व्यग्र वेळापत्रकातही त्यानं जवानांसोबत आपला क्वालिटी टाइम व्यतित केला. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, फॅन्सकडून त्याचं कौतुक होत आहे.

Salman Khan Image
Priyanka-Nick : प्रियांका-निकबद्दलच्या वक्तव्यावर चाहते भडकले, काय म्हणाली होती टपारिया?

विशाखापट्टणममध्ये नौदलाच्या जवानांसोबत जेवढा वेळ त्यानं घालवला, त्यात तो खूपच एक्साइटेड झालेला दिसला. हाती तिरंगा घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सलमान खान खूपच 'फुडी' आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्याच्या आवडीनुसार तो नौदलाच्या जवानांसोबत पोळ्या करतानाही दिसला. सलमाननं जवानांसोबत खूप गप्पाही मारल्या. तसंच जवानांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आपली मतेही मांडली.

नौदलाचे जवान फिटनेसवर जास्त भर देतात. अशावेळी सलमाननं जवानांसोबत वर्कआउटही केलं. जहाजावर त्यानं जोरबैठकाही मारल्या. विशाखापट्टणममध्ये जवानांसोबत वेळ घालवताना त्यांच्यात तो मिसळून गेला होता. त्याचं हे वेगळंच रूप बघून त्याचे चाहते खूपच भारावून गेले आहेत. त्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com