Salman Khan Threat Case: अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन उघड; मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
Salman Khan threat case
Salman Khan threat caseTwitter

Rajasthan News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून (Rajasthan) ताब्यात घेण्यात आले आहे. जोधपूरच्या लुनी पोलिसांनी रविवारी आरोपी धाकड राम विश्नोई यांचा मुलगा रामलाल (21 वर्षे) रा. सियागो, धानी रोहिचा कलान याला ताब्यात घेतले. आरोपीला मुंबई येथून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Salman Khan threat case
Ashok Saraf: अशोक मामांना जीवनगौरव मिळाल्यावर निवेदिता सराफ यांच्या भावना अनावर, प्रेक्षकांचे मानले आभार

जोधपूरचे डीसीपी पश्चिम गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सलमान खान व्यतिरिक्त आरोपी धाकड राम विश्नोईने पंजाबचा गायक सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनाही ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील सदर पोलिस ठाण्याचे एक पथकही आरोपीला पकडण्यासाठी शुक्रवारी, २४ मार्च रोजी जोधपूरला रवाना झाले होते. ’

Salman Khan threat case
Rakhi Sawant: सलमानला मिळालेल्या धमकीवर राखीची प्रतिक्रिया, ‘सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे...’ म्हणत केली टीका

जिवे मारण्याची धमकी ईमेलच्या माध्यमातून पाठवल्याप्रकरणी मुंबई शहर वांद्रे सर्कल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एएसआय बजरंग जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईहून एक पथक रविवारी जोधपूरला रवाना झाले आहे.  

जयप्रकाश अटल यांच्या निरिक्षणाखाली लूणी पोलीस ठाण्यातून मदत उपलब्ध करून देण्यात आली. लूणीचे एसएचओ ईश्वर चंद्र पारीक यांच्यासह पथकाने आरोपी धाकड राम विश्नोईला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.

Salman Khan threat case
Akanksha Dubey Video: मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या व्हिडिओत आकांक्षा खूप आनंदी, 'जस्ट ट्राय' म्हणत शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

12 सप्टेंबर 2022 रोजी सरदारपुरा पोलिस स्टेशनच्या पथकाने धाकड रामला अवैध शस्त्रांसह अटक केली होती. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आता मुंबई पोलीस आरोपींची सखोल चौकशी करणार आहेत. तसेच, लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि त्यांच्या इतर संपर्कांचा शोध घेतला जाईल. आरोपींना मुंबई न्यायालयात हजर केल्यानंतर रिमांडची मागणी करण्यात येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com