
Shah Rukh Khan: शाहरुख खानचा 'पठान' 25 जानेवारीला सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटातून चाहत्यांना शाहरुखची क्रेझ पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत कमाई करतोय. सोशल मीडियावर बहुतांश व्हिडिओ शाहरुख आणि सलमान खानच्या अॅक्शन सीक्वेन्सचे व्हायरल होत आहे.
'पठान'मध्ये सलमानचा सुमारे 20 मिनिटांचा कॅमिओ आणि दोघांची जुगलबंदी सर्वांनाच भावली. आता 'पठान'मध्ये सलमानने शाहरुखला 'वाचवले', पण आता 'पठाण'ची पाळी आहे. होय, आता शाहरुखही सलमानच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटात दिसणार आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
लवकरच दोघेही 'टायगर 3' चे अॅक्शन सीन शूट करताना दिसणार आहेत. मात्र, या बातम्या बराच काळ बाहेर येत होत्या. शाहरुख खानला सध्या 'टायगर 3' चे शूटिंग करावे लागत आहे, कारण त्याला सलमानसोबत बरेच दिवस शूट करण्यासाठी वेळ मिळाला नाही. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सलमानच्या चित्रपटाची शूटिंग सुरू करू शकतो.
'टायगर 3' मध्ये शाहरुख खानच्या अॅक्शन सीनसाठी खास विग तयार करण्यात आला आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की टायगर 3 मध्ये शाहरुख नव्या लूकमध्ये दिसणार आहे. पठान आणि टायगर 3 ची निर्मिती YRF च्या बॅनरखाली झाली आहे. पठान चित्रपटाची कथा जिथून संपली तिथून टायगर ३ ची कथा सुरू होणार आहे.
शाहरुख आणि सलमान खान आपापल्या चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने 'टायगर 3'मधील अॅक्शन सीन शूट होऊ शकले नाहीत. एप्रिलमध्ये रिलीज होणाऱ्या 'किसी का भाई किसी की जान' या आगामी चित्रपटात सलमान व्यस्त होता.
त्याचवेळी शाहरुख खान त्याचे आगाामी चित्रपट जवान आणि डंकीच्या तयारीत व्यस्त होता. मात्र, पठानमध्ये दोघांना एकत्र पाहिल्याने चाहत्यांना काही काळासाठी सुख:द धक्का बसला होता. आता लवकरच हे दोघेही 'टायगर 3' चे शूटिंग लवकरच पूर्ण करण्याची शक्यता आहे.
शाहरुख खानच्या पठान चित्रपटाने जगभरात चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम, अभिनेत्री दीपिका पदुकोण आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.