Viral Video: सलमानला 'या' अभिनेत्रीसोबत करायचे लग्न, अभिनेत्रीने नाही तर तिच्या वडिलांनीच दिला नकार...

Salman Khan Marriage: 1990 मधील सलमानच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Salman Khan
Salman KhanSaam Tv

Viral Video Of Salman Khan: सलमान खानचे नाव मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून घेतले जाते. अनेक मुली सलमानची वेड्या आहेत. कित्येक अभिनेत्रींनसोबत सलमानचे नाव जोडले गेले आहे. परंतु अद्याप सलमानने लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

चित्रपटांमधील त्याच्या रोमँटिक अंदाजाने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान जुही चावलासोबत लग्न करण्याविषयी बोलत आहे. सलमान खान हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहतेही व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

Salman Khan
Rohit Shetty: करियरमध्ये तुटपुंजी कमाई कमावणारा रोहित आज आहे कोट्याधीश, वडिलांमुळे झाला Action Director

1990 मधील सलमानच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खानने खुलासा केला आहे की त्याने एकदा अभिनेत्री जुही चावलाच्या वडिलांकडे जुही लग्न करण्यासाठी हात मागितला होता. पण दुर्दैवाने सलमानला अभिनेत्रीच्या वडिलांनी नकार दिला. व्हिडिओमध्ये सलमानने प्रिंटेड ब्लू पोलो शर्ट, जीन्स आणि टोपी घातली आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान म्हणतो, "जुही खूप गोड आहे. ती एक सुंदर मुलगी आहे. मी तिच्या वडिलांना विचारले की ते तिला माझ्याशी लग्न करू देतील का?" यावर मुलाखत घेणाऱ्या सूत्रसंचालिका त्याला विचारतात, "तुम्ही त्यांना विचारले? ते काय म्हणाला?" सलमान भुवया उंचावतो आणि म्हणतो, "नाही म्हणाले. मला वाटतं मी फिट नाही." व्हिडिओमध्ये सलमान खान अतिशय नम्रपणे बोलताना दिसत आहे.

चाहत्यांनी ट्विटरवर व्हिडिओ क्लिपवर ‘हार्टब्रेक मोमेंट’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने, "..आणि त्यानंतर त्याने कोणाशीही लग्न केले नाही. किती आज्ञाधारक मूल." तरच काही नेटकरी हा व्हिडिओ खोटा असल्याचे देखील म्हणत आहेत.

जुही आणि सलमानने अनिल कपूर आणि गोविंदासोबत फक्त कॉमेडी चित्रपट दिवाना मस्ताना (1997) मध्ये एकत्र काम केले आहे. त्यात दबंग खानची खास भूमिका होती. जुही चावलाबद्दल बोलायचे तर, तिने जय मेहताशी लग्न केले आहे, या दोघांना दोन मुले आहेत, मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन.

सलमान खान आणि जुही चावला अनेकदा पार्टी आणि गॅदरिंगमध्ये भेटतात. याशिवाय दोघेही एकदा बिग बॉसमध्ये एकत्र दिसले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com