Bigg Boss 2 Host: अखेर ठरलं... ‘बिग बॉस ओटीटी २’चा होस्टिंग करणार ‘हा’ सेलिब्रिटी

Bigg Boss 2 OTT Promo: नुकताच या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. तो प्रोमो पाहून प्रेक्षकांना एक नवं गिफ्ट मिळालं. त्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना नवा होस्ट मिळाला आहे.
Bigg Boss 2 Host Confirm
Bigg Boss 2 Host ConfirmSaam Tv

Bigg Boss 2 Host Confirm: टेलिव्हिजन सृष्टीसह ओटीटीवरही टीआरपीमध्ये अव्वल ठरलेल्या बिग बॉसची नेहमीच चर्चा होत असते. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी १’ ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. या सीझनची विजेती स्पर्धक दिव्या अग्रवाल झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी २’ ची बरीच चर्चा सुरू आहे. नुकताच या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. तो प्रोमो पाहून प्रेक्षकांना एक नवं गिफ्ट मिळालं. त्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना नवा होस्ट मिळाला आहे.

Bigg Boss 2 Host Confirm
Sunny Leone Threats: बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी येत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या, सनी लियोनीने केला धक्कादायक खुलासा

नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटी २ चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना एक मोठ्ठं सरप्राईज मिळालं आहे. ते सरप्राईज म्हणजे, बिग बॉस ओटीटीच्या सूत्रसंचालनाची धुरा दस्तुरखुद्द सलमान खानकडे देण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान शोबद्दल माहिती देताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन होस्ट करण्यासाठी सलमान खानने करण जोहरची जागा घेतली आहे, याची माहिती गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना माहित आहे.

'Big Boss OTT 2' च्या प्रोमोमध्ये सलमान खान या शो बद्दल माहिती सांगत आहे. वास्तविक यावेळी 'बिग बॉस ओटीटी' वेगळ्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. आता ते Voot वर नाही तर Jio सिनेमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुन्हा एकदा सलमान खान सर्वांची शाळा घेताना आपल्याला दिसणार आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान म्हणतो, 'क्रिकेटनंतर काय बघायचे, हीच कोंडी आहे. आता २४ तास Jio Cinema Entertainment आहे. मी 'बिग बॉस ओटीटी' घेऊन येत आहे.

Bigg Boss 2 Host Confirm
Gadar To Re - Release : सनी देओल- अमिषा पटेल जोडी दिसणार एकत्र, २२ वर्षांनंतर 'गदर: एक प्रेम कथा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

आतापर्यंत निर्मात्यांनी 'Big Boss OTT 2' मधील स्पर्धकांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. धीरज धुपर, फैझू शेख, जिया शंकर, राजीव सेन, पूजा गौरपासून ते अंजली अरोरा आणि आदित्य नारायण हे कलाकार या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 'बिग बॉस OTT' हा डिजिटल रिॲलिटी शो असून २०२१ मध्ये याचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com