Javed Akhtar: जावेद अख्तर यांच्या कठीण काळात सलीम खान बनले देवदूत

महिन्याला १०० रुपये घेऊन जावेद अख्तर यांनी संवाद लिहायला सुरुवात केली.
Javed Akhtar And Salim Khan
Javed Akhtar And Salim Khan Saam Tv

Javed Akhtar Birthday Special: आज जावेद अख्तर यांचा वाढदिवस आहे. जावेद अख्तर 78 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी भारतीय चित्रपट आणि साहित्याला सर्वोच्च आणि वेगळे स्थान मिळवून दिले आहे. जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यांचे वडील जन्नीसार अख्तर प्रसिद्ध कवी होते. इतकंच नाही तर जावेदचे आजोबा मुज्तार खैराबादी हेही प्रसिद्ध कवी होते. जावेदची आई सफिया अख्तर याही प्रसिद्ध लेखिका होत्या.

इतके प्रसिद्ध कवी घराणे असूनही जावेद साहेबांना खूप संघर्ष करावा लागला. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. कधी न खाता, तर कधी चणे खाऊन भूक भागवली. पैसे नसताना ते पायी प्रवास करायचे.

Javed Akhtar And Salim Khan
Javed Akhtar: खुद्द शबाना आझमींनी शेअर केला पती जावेद अख्तर यांचा खडतर प्रवास

जावेद अख्तर यांनी 1964 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले नशीब अजमावण्यासाठी मुंबई गाठली. मात्र मुंबईत राहायला जागा नसल्याने त्यांनी कित्येक रात्री झाडाखाली काढल्या. ते बराच काळ बेघर होते. 2 वर्षे ठावठिकाणा भेटावा यासाठी भटकत होते. शेवटी त्यांना कमाल अमरोहीच्या स्टुडिओत राहायला जागा मिळाली. तरीही त्यांची कामासाठी भटकंती सुरूच होती.

राहण्यासाठी जागा मिळाल्यानंतरही त्यांच्यासमोर पोटाचा प्रश्न होता. कारण त्यांना नोकरी मिळाली नव्हती. दरम्यान, त्यांनी त्यांची कौटुंबिक लेखन परंपरा वाढवली आणि संवाद लिहिण्यास सुरुवात केली. महिन्याला १०० रुपये घेऊन संवाद लिहायला सुरुवात केली. यातही त्याचे काम चालत नव्हते, म्हणून त्यांनी लहानमोठ्या नोकऱ्या केल्या.

प्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या जावेद अख्तरसाठी मिळणारे पैसे फराह कमी होते. भूक भागवण्यासाठी अनेक वेळा ते चणे खाऊन झोपले आहते. जावेद यांचा प्रवास सोपा नव्हता. पण 1969 साली त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी सलीम खान यांच्यासोबत काम करण्यास सुरूवात केली. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षक आणि बॉलिवूडला खूप आवडली. दोघांनी मिळून जवळपास 24 चित्रपटांमध्ये संवाद लिहिले आणि यश मिळवले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com