'...मला मूल नको होत, मी गर्भपात केला' अखेर समंथा म्हणाली...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सामंथाने सोडली आहे.
'...मला मूल नको होत, मी गर्भपात केला' अखेर समंथा म्हणाली...
'...मला मूल नको होत, मी गर्भपात केला' अखेर समंथा म्हणाली...Instagram/@samathaprabhuruthoffl

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सामंथाने सोडली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या 4 वर्षानंतर विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या विभक्त होण्यावर अनेक अफवा उठल्या होत्या. सामंथा बद्दल अनेक कथिक गोष्टी ऐकण्यात येत होत्या. मात्र आता तिने Samantha Ruth Prabhu तिच्या घटस्फोटानंतर आपलं मौन सोडलं आहे. समंथावर केल्या जाणाऱ्या अनेक आरोपांबाबत आता ती व्यक्त झाली आहे. तिने तिच्या इन्स्टाच्या स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे. तिने तिच्या कठीण काळात साथ देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचसोबत अफवांनी मी खचून जाणार नाही, असं तिने ठामपणे म्हटलं आहे.

'...मला मूल नको होत, मी गर्भपात केला' अखेर समंथा म्हणाली...
'...मला मूल नको होत, मी गर्भपात केला' अखेर समंथा म्हणाली...Instagram/@samathaprabhuruthoffl

समंथाची पोस्ट- 'माझ्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संकटामध्ये तुम्ही जी मला भावनिक सहानुभूती देत आहात, ते पाहून मी खरोखर भारावून गेली आहे. तुम्ही दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल, काळजीबद्दल आणि खोट्या अफवांपासून माझा बचाव केलात आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. ते म्हणतात, माझं अफेअर होतं, मला आमचं मूल नको होतं, मी संधीसाधू आहे. आता तर मी गर्भपात केला आहे... अशीही अफवा पसरली गेली आहे.

घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेदनादायक असते. या सर्व मधून मला बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण मी तुम्हाला वचन देते. आणि ते जे काही म्हणतील त्याने मी खचून जाणार नाही,' अशी पोस्ट तिने इंस्टाग्राम च्या स्टोरी मध्ये लिहिली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.