Samantha Ruth Prabhu : घटस्फोटनंतर समंथाला झाला 'हा' आजार... नेमकं खरे काय?

समंथाच्या टीमने तिच्या आजाराबाबत माहिती दिली आहे.
Samantha Ruth Prabhu Image
Samantha Ruth Prabhu ImageSaam Tv

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की समंथाला त्वचेशी संबंधित समस्या आहे. तसेच ती उपचारासाठी परदेशात गेली आहे. ही बातमी समजल्यानंतर समंथाचे चाहते खूप दुखी झाले आहेत आणि समंथाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, समंथाच्या टीमने तिच्या आजाराबाबत माहिती दिली आहे.

Samantha Ruth Prabhu Image
Katrina Post : कतरिना कैफचा पती विकी कौशलसोबत रोमँटिक मूव्हमेंट, फोटो व्हायरल

बर्‍याच काळापासून असा दावा केला जात आहे की समंथा(Skin Disease) त्वचेच्या आजाराने त्रस्त आहे, ज्यासाठी ती परदेशात उपचार घेत आहे. मात्र, आता समंथाच्या टीमने या दाव्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व अफवा असल्याचे सांगून, समंथाचा मॅनेजर महेंद्र म्हणाला, 'या सर्व फक्त गॉसिप आहेत'. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, समंथा रुथ प्रभूला 'पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन' नावाच्या त्वचेचा आजार झाला आहे. त्वचेची ही समस्या सूर्यप्रकाशाच्या तीव्र किरणांमुळे उद्भवते. याशिवाय समंथा या त्वचेच्या आजारावर उपचारासाठी अमेरिकेला गेल्याचेही बोलले जात आहे.

Samantha Ruth Prabhu Image
Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस १६ मध्ये सहभागी होणार? पोस्ट शेअर करत दिली माहिती

समंथा प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरून पूर्णपणे गायब आहे. समंथाने १० सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. तसेच, जुलै समंथाने तिचे कोणतेही फोटो किंवा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केलेले नाहीत. याशिवाय समंथा अखेरची करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसली होती. समंथा बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडिया तसेच अनेक कार्यक्रमात अनुपस्थित आहे. अशा परिस्थितीत समंथाच्या तब्येतीची चाहत्यांना खूप काळजी वाटत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समंथा अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. सर्वात आधी समंथा साऊथच्या 'यशोदा' चित्रपटात दिसणार आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये समंथा एका गर्भवती महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय ती 'खुशी' या चित्रपटात शकुंतलम आणि विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com