Samantha Ruth Prabhu: समंथाने धुडकावली या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर? स्वतःच्याच टीमने केला मोठा खुलासा...

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा 2’मध्ये परफॉर्म करण्याची ऑफर समंथानं नाकारली आहे.
Samantha Ruth Prabhu Image
Samantha Ruth Prabhu ImageSaam Tv

Samantha Ruth Prabhu On Pushpa 2: दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून समंथा ही तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली होती. आता समंथा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा 2’मध्ये (Pushpa 2) परफॉर्म करण्याची ऑफर समंथानं नाकारली आहे. ‘पुष्पा 2’मध्ये आयटम सॉंगची ऑफर तिला देण्यात आली होती. मात्र, तिनं त्यासाठी नकार दिला.

समांथाचे पुष्पा मधील ‘ऊ अंटावा’ (Oo Antava) हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यातील समंथाचे आणि दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनची (Allu Arjun) प्रेक्षकांना फारच आवडली. पुष्पा २ मध्ये ही समांथाचा डान्स असावा असे, तिच्या चाहत्यांना नेहमी वाटायचे परंतू तिने दिलेला हा नकार दिल्याचे कळताच चाहते नाराज झाले. समांथाच्या डान्समुळे आणि विविध चित्रपटांतील अभिनयामुळे चाहत्यांमध्ये बरीच वाढ झाली आहे. आजही हे गाणं पार्ट्यांमध्ये आपण ऐकतो.

यासर्व चर्चेनंतर, समंथाच्या टीमनं पुढे येत त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. या सगळ्या अफवा आहेत, असे त्यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाला माहिती दिली होती. दरम्यान, व्हायरल झालेल्या बातमीनुसार, 'पुष्पा 2' चे दिग्दर्शक सुकुमार यांनी समंथाला विचारले असता तिनं चित्रपटाला नकार दिला असून सध्या ती आयटम नंबरसाठी रेडी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, या सगळ्या अफवा आहेत असे ही स्पष्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान मिडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'पुष्पा 2'चे दिग्दर्शक सुकुमार आणि निर्माते 'ऊ अंटावा'चे ब्लॉकबस्टर यश लक्षात घेऊन समंथाला चित्रपटाच्या सिक्वेलसाठी तिला फारच प्रयत्न करीत असल्याचे म्हटले जात आहे. दिग्दर्शक सुकुमार यांनीही एक छोटासा सिनेमा बनवला आहे. 'पुष्पा 2'मध्ये समांथासाठी एक छोटं कॅरेक्टर डेव्हलप करण्यात आलं होतं. त्याची सुद्धा समंथानं ऑफर नाकारली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com