Samantha Ruth Prabhu: समंथा दिसणार अॅक्शन पटात, स्टंटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

'यशोदा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच पडद्यामागे घडलेल्या स्टंट सीक्वेन्सचे चित्रीकरण प्रदर्शित केले आहे.
Samantha Ruth Prabhu Image
Samantha Ruth Prabhu ImageSaam Tv

Samantha Prabhu Upcoming Movie: समंथा रुथ प्रभू लवकरच एका अॅक्शन चित्रपटामध्ये दिसणार आहे. समंथा या चित्रपटातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. 'द फॅमिली मॅन' सीझन 2 या वेबसीरिजच्या माध्यमातून समंथाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. आगामी चित्रपट 'यशोदा'मधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आणखी एक आश्चर्य धक्का बसणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच पडद्यामागे घडलेल्या स्टंट सीक्वेन्सचे चित्रीकरण प्रदर्शित केले आहे. समंथाने सर्व स्टंट कोणताही डुप्लिकेट ना वापरता केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती कठीण मूव्ह्ज करताना देखील दिसत आहे.

Samantha Ruth Prabhu Image
Anupam Kher: अनुपम खेर 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेल्याने फॅन्स भडकले, नेमकं काय झालं?

चित्रपटाचा स्टंट दिग्दर्शक यानिक बेन याने स्टंट सीक्वेन्सवर त्याची प्रतिक्रिया सुद्धा या व्हिडिओमध्ये दिली आहे. यानिकने सांगितले की, त्याला सर्व वास्तववादी दिसावे असे वाटत होते. दोरी किंवा इतर गोष्टी वापरल्या असत्या तर सीन प्रभावी वाटला नसत. त्याने समंथावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Movie)

“मला समंथासोबत काम करायला आवडते कारण ती नेहमीच स्वतःला कामामध्ये संपूर्ण झोकून देते. काहीतरी चांगलं करण्यासाठी ती तिचं सर्वोत्तम द्यायला तयार असते आणि एक अॅक्शन डायरेक्टर म्हणून आपल्याला तेच हवे असते. आम्हाला असेच कलाकार हवे असतात जे स्वतःला कामात संपूर्णपणे झोकून देतील आणि त्यांच्या या कृतीतीतून सर्वोत्कृष्ट सीन मिळेल," असे यानिक म्हणाला.

हरीश नारायण आणि हरी शंकर या जोडीने या चित्रपटाचे लिखित आणि दिग्दर्शन केले आहे. 'यशोदा' एका तरुणीची कथा आहे, जी सरोगेट रॅकेटच्या जाळ्यात अडकली आहे. ट्रेलरमध्ये समंथा रुथ प्रभूला एक नाजूक आणि असहाय्य मुलगी दाखवली आहे, परंतु जेव्हा बंड करते तेव्हा सगळ्यांच धक्का बसतो.

'यशोदा' 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. समंथा रुथ प्रभू सध्या अमेरिकेत आहेत. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये समंथाने मायोसिटिस नावाचा आजार तिला झाला असल्याचे सांगितले होते. (Social Media)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com