हनुमान चालीसा आणि अजानमध्ये एकच ताकद- सोनू सूद

अभिनेता सोनू सूदनेही भोंग्याच्या राजकारणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हनुमान चालीसा आणि अजानमध्ये एकच ताकद- सोनू सूद
सोनू सूदSaam Tv

गोविंद साळुंके

अहमदनगर: सध्या भोंग्याच्या वादावरून राज्यातील राजकीय वातारण तापलेल आहे. राज ठाकरेंनी औरंगाबादेत दिलेलं अल्टिमेटम ते आज मनसैनिकांवर पोलिसांनी केलेली कारवाई यावर मनसे आक्रमक दिसून आली. या मुद्यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटून आल्या. आता अभिनेता सोनू सूदनेही भोंग्याच्या राजकारणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तो म्हणाला, मला वाटत देशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपण धर्म आणि जात यापासून बाहेर निघू. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्ये आहे. देश एकत्र येणे हे जास्त महत्वाचे आहे. धर्म हा लोकांनी बनवला आहे. आपण यापासून बाहेर पडलं पाहिजे. देशात अनेक मोठे मोठे मुद्दे आहेत. राजकारणाने जनतेचे प्रश्न सोडवावे. आपण जर यातच अडकून राहील तर सामान्य लोकांच्या अडचणी कधीही संपणार नाहीत. पहिल्यांदा हे कस संपवायचं हे पहिले पाहिजे बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीत असेही सोनू सूदनं यावेळी म्हंटल.

सोनू सूद
UP: 13 वर्षीय मुलगी, आधी स्टेशनवर गँगरेप नंतर पोलीस स्टेशनमध्येही बलात्कार!

तर, सोनू सुद दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणुन देशात प्रसिद्ध आहे, कोरोना काळातही त्यांनी केलेल्या मदतीने लोकांनी त्यांना "जरुरतमंदो का मसिहा गरिबो का मासिहा' अश्या विविध उपाध्या दिल्या आहे. आज कोपरगाव नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २६ आशा सेविकांना अभिनेता सोनु सूद यांनी सायकलचे वाटप केले.

हे देखील पहा-

दरम्यान, मशिदी समाेर अथवा शहरात हनुमान चालिसा (hanuman chalisa) लावण्यावरुन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज मनसेचे कार्यकर्ते आणि पाेलीस दल यांच्यात खटके उडालेले दिसून आले. साेलापूर , धुळे , हिंगाेली , पिंपरी चिंचवड येथे पाेलीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.