
Sameer Wankhede Moves Bombay HC: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी रिट पिटीशन दाखल केली आहे. व्हॅकेशन कोर्टात त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरुख खानने त्यांना पाठवलेले मेसेज जोडले आहे. त्यांचे हे व्हॉट्सॲप आता समोर आले आहेत. या चॅट्समध्ये शाहरुख समीर वानखेडे यांना विनंती करत आहे.
शाहरुख खान - समीर वानखेडे यांच्यातील संभाषण
शाहरुख - ही घटना आर्यनच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. या देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणांची गरज आहे. तुम्ही आणि मी देशासाठी काही नाही केले आहे. आता आपल्या पुढील पिढीने याचे पालन केले पाहिजे आणि भविष्यासाठी पुढील पिढीला तयार करणे आपल्या हातात आहे. तुमच्या दयाळूपणाबद्दल आणि समर्थनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. प्रेम SRK
वानखेडे - माझ्या शुभेच्छा
शाहरुख - धन्यवाद. तुम्ही एक चांगले व्यक्ती आहेस. आज मी विनंती करतो की कृपया काळजी त्याची घ्या. प्रेम SRK
वानखेडे - नक्की, काळजी करू नकोस.
शाहरुख - देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही सांगाल तेव्हा मी स्वतः यायला तयार आहे आणि मी तेव्हा तुम्हाला मिठीही मारेल. कृपया तुमच्या सोयीनुसार वेळ कळवा.
शाहरुख खान - कायद्याच्या सीमा. मी तुम्हाला विनवणी करतो, कृपया त्याला त्या तुरुंगात राहू देऊ नका. तो माणूस म्हणून कोलमडून पडेल. काही स्वार्थी लोकांमुळे त्याचा आत्मा नष्ट होईल. तुम्ही मला वचन दिले होते.
माझ्या मुलाला अशा ठिकाणी ठेवणार नाही जिथे तो कोलमडून बाहेर येईल आणि यात त्याचा काही दोष नाही. काही स्वार्थी लोक हे करत आहेत त्याला एक चांगला माणूस म्हणून तुम्ही साथ देऊ नका.
मी तुम्हाला वचन देतो की मी काहीही करायला तयार आहे. त्यांना काहीही देण्यास तयार आहे. पण कृपया माझ्या मुलाला घरी पाठवा. तुम्हाला हे देखील माहित आहे की तुमच्या काळीज त्याच्यासाठी खूप कठोर झाले आहे. कृपा करून एक बाप म्हणून विनवणी करतो.
वानखेडे - शाहरुख मी तुला एक चांगला माणूस म्हणून ओळखतो.
काय आहे हे प्रकरण?
समीर वानखेडे यांनी गोव्याला जाणाऱ्या कोर्डीलिया क्रूझवर छापा टाकत ड्रग प्रकरणात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. याप्रकरणी आर्यन खानला तुरुंगात जावे लागले होते.
आता हे प्रकरण तब्बल 19 महिन्यांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. समीर वानखेडे आणि इतर काही जणांनी मिळून आर्यन खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे.
आता भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. सीबीआयने वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील घरावर छापा देखील टाकला होता. तसंच सीबीआयने समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे मोबाईल जप्त केले आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.