MC Stan Expensive Gift: MC Stanला जगप्रसिद्ध व्यक्तीकडून शूज गिफ्ट, किंमत ऐकून थक्का व्हाल!

Sania Mirza Gifted MC Stan Shoes: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने एमसी स्टॅनला एक अनमोल भेट दिली.
Sania Mirza Gifted MC Stan Expensive Shoes
Sania Mirza Gifted MC Stan Expensive ShoesInstagram m___c___stan

Sania Mirza Gifted MC Stan Expensive Shoes: 'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅन त्याच्या ८० हजाराच्या शूजमुळे चर्चेत आला होता. त्याच्या या शूजची सर्वत्र चर्चा होती. बिग बॉसनंतर तो जिथे जाईल तिथे सर्वजण त्याला त्याच्या ८० हजारच्या शूजविषयी विचारत होते. त्याच्या शूजची चर्चा टेनिसपटू सानिया मिर्झापर्यंत पोचली आणि तिने चक्क त्याला शूज गिफ्ट केलं.

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने एमसी स्टॅनला एक अनमोल भेट दिली. सानियाने दिलेल्या या गिफ्टमुळे एमसी स्टॅनचा आनंद गगनात मावत नव्हता. हे गिफ्ट्स मिळाल्यानंतर झालेला आनंद एमसी स्टॅनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला तसेच सानियाचे आभार देखील मानले.

Sania Mirza Gifted MC Stan Expensive Shoes
Alia-Ranbir Anniversary Celebration: आलिया- रणबीर पापाराझींसमोरच झाले रोमँटिक; व्हिडीओ पाहून चाहते झाले चूर, व्हिडीओ व्हायरल

गेल्या महिन्याच्या 5 तारखेला, भारतीय टेनिस आयकॉन सानिया मिर्झा हैदराबादच्या लाल बहादूर टेनिस स्टेडियमवर शेवटचा सामना खेळली. बिग बॉस 16चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅनला कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. स्टॅनने तिथे येऊन परफॉर्म केले आणि सानियाची कारकीर्दही साजरी केली.

स्टॅनच्या हावभावावर खूश होऊन सानियाने त्याला 91,000 रुपये किमतीचे काळे नायकी शूज आणि 30,000 रुपये किमतीचे सनग्लासेस भेट दिले. स्टॅनला हे गिफ्ट्स मिळाल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि त्याने सानियाचे आभार मनात इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली.

एमसी स्टॅनने सानिया मिर्झाकडून मिळालेल्या भेटवस्तूंचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तिला 'आपा' (उर्दूमध्ये मोठी बहीण) संबोधून तिचे आभार मानले. बिग बॉस 16 च्या विजेत्याने लिहिले, 'तेरा घर आयेगा इसमें', आपा. धन्यवाद"

MC Stan Instagram Story
MC Stan Instagram Story Saam TV

एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा फराह खानच्या मुंबई पेंटहाऊसमध्ये बिग बॉस 16 च्या पोस्ट-फिनाले पार्टीमध्ये भेटले. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. विशेष म्हणजे, स्टॅनने सानिया मिर्झाच्या हैद्राबाद येथे टेनिस रिटायरमेंट बॅशमध्येही परफॉर्म करण्यासाठी तिने त्याला विचारले होते.

बिग बॉस 16 जिंकल्यापासून एमसी स्टॅन देशभरात लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. अलीकडेच इंदूरमध्ये त्याच्या शोदरम्यान बराच गदारोळ झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com