
'मुन्ना भाई एम बी बी एस' हा चित्रपट नक्कीच तुमच्या लक्षात असेल. या चित्रपटाने संजय दत्तला जीवनदान दिले असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाने बॉलिवूडसह प्रेक्षकांना एक सुपरहिट जोडी दिली मुन्नाभाई आणि सर्किट. या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजहे या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर 'मुन्नाभाई ३'ची वाट पाहत आहेत.
२००६ साली 'लगे राहो मुन्नाभाई' चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १७ वर्ष झाली आहेत. परंतु सर्किट आणि मुन्नाभाईची क्रेज कमी झालेली नाही. प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायची आहे. सर्किट आणि मुन्नाभाईच्या चाहत्यांसासाठी एक आनंदाची बातमी आहे.
संजय दत्त आणि अरशद वारसी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. या व्हिडीओमध्ये 'मुन्नाभाई' चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी देखील दिसत आहेत.
संजय दत्त आणि अरशद वारसी यांच्या व्हायरल व्हिडीओ संजय दत्त आणि राजकुमार हिरानी बोलत बोलत चालताना दिसत आहेत. त्यानंतर अरशद वारसी येताना दिसत आहे. संजय दत्तने ऑरगे रंगांचे शर्ट आणि आणि व्हाईट पॅन्ट घातली आहे.
अरशद वारसी काळे कपडे आणि गळ्यात चैनी घातल्या हेत. दोघेही त्यांच्या मुन्ना आणि सर्किटच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला शूटिंग चालू असल्याचे दिसत आहे. तर त्यांच्या मागे मेडिकल देखील आहेत. त्यामुळे हे शूट हॉस्पटिलमध्ये होत आहे हे नक्की.
या व्हिडीओच्या मागे आवाज देखील येत आहेत. मुन्नाभाईमधील टायटल ट्रक सुरू आहे. तर अरशद विषारी देखील जोरजोरात काहीतरी बोलत आहे. तर मागून आवाज येत 'मुन्ना परत आला.' तर व्हिडीओमध्ये राजकुमार हिरानी म्हणत आहेत, 'अखेर आपण एकत्र आलो.' (Latest Entertainment News)
या व्हायरल व्हिडीओनंतर चाहते 'मुन्ना भाई 3' पाहायला मिळणार यासाठी उत्सुक आहेत. पण 'मुन्ना भाई 3'ची निर्मिती सुरू असल्याची चर्चा पहिल्यांदा होत नाहीय. 'मुन्ना भाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्ना भाई' अनेकदा या चित्रपटाची चर्चा झाली आहे.
'संजय दत्त आणि अरशद वारसी 'मुन्नाभाई ३'च्या आधी 'वेलकम बॅक टू द जंगल'मध्ये एकत्र दिसणार आहेत. 'वेलकम' आणि 'वेलकम 2'च्या या सिक्वेलमध्ये अक्षय कुमार, परेश रावल, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, रविना टंडन असे अनेक कलाकार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.