Santosh Juvekar - Kushal Badrike Comedy Video: कुत्रे गाडीमागे भुंकत का धावतात? कुशल बद्रिके - संतोष जुवेकरला सापडले भन्नाट उत्तर, पाहा

Santosh Juvekar Shares Video: संतोष जुवेकरने नुकताच एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Santosh Juvekar - Kushal Badrike Comedy Video
Santosh Juvekar - Kushal Badrike Comedy VideoSaam TV

Marathi Actors Comedy Video: अभिनेता संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि अभिजीत चव्हाण केल्या काही वर्षांपासून स्ट्रगल साला या विनोदी सीरीजचा भाग आहेत. विजु माने दिग्दर्शित ही सीरीज खूप लोकप्रिय आहे. या सीरीजच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओतील प्रश्नाचे उत्तर कधीच तुम्हाला देखील हवे असेल.

संतोष जुवेकरने नुकताच एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला एक गाडी दिसत आहे. या गाडीच्यामागे काही कुत्रे भुंकत आहेत. हे पाहून 'कुशल, संतोषला विचारतो गाडीमागे कुत्रे का भुंकत असतील.

Santosh Juvekar - Kushal Badrike Comedy Video
Kartik Aaryan Video Leaked: कार्तिक आर्यनच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील व्हिडिओ लीक, पहिल्याच गाण्यात कार्तिक - कियाराची भन्नाट केमिस्ट्री

यावर संतोष, कुशलला उत्तर देतो की, त्यांना गाडी चालवायची असते, पण कोणी चालवायला देत नाही रे.' संतोषचे उत्तर ऐकून कुशल त्याच्याकडे एक कटाक्ष टाकतो. त्यांना दोघेही जोरजोरात असू लागतात.

संतोषने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये ट्रोलर्सवर टीका देखील केली आहे. संतोषने लिहिले आहे की, 'कुत्रे गाडीच्या मागे का भुंकत धावतात? याच उत्तर आम्हाला सापडलं आमचे आणि आमच्यातले रातकिडे. (खास कलम : हे काहीसं सोशल मीडिया ट्रोलस ना पण लागू होत बरका) Struggler साला.' तसेच संतोषने ही पोस्ट कुशल बद्रिके, विजू माने आणि अभिजीत चव्हाण यांना टॅग केली आहे.

संतोष जुवेकर रावरंभा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट हा प्रदर्शित झाला असून संतोष या चित्रपटामध्ये जालिंदर ही भूमिका साकारत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com