Sanya Malhotra Post: थिएटरबाहेर सान्या मल्होत्राचा धिंगाणा; अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Sanya Malhotra Video: सान्या मल्होत्राने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Sanya Malhotra Viral Dance Video
Sanya Malhotra Viral Dance VideoSaam TV

Sanya Malhotra Dance Video:

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक वेडे झाले आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्च आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी व्हायरल होत आहेत. नेटकरी या गाण्यावर रील्स तयार करत आहेत.

दरम्यान या चित्रपटातील अभिनेत्री सान्या मल्होत्राचे देखील 'जवान'चे वेडनपाहायला मिळाले आहे. सान्या मल्होत्राने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sanya Malhotra Viral Dance Video
Nora Fatehi Post: 'PM नरेंद्र मोदी तुमचे खूप आभार...', अभिनेत्री नोरा फतेहीने पंतप्रधानांचे केले कौतुक

या व्हिडीओमध्ये सान्या मल्होत्रा थिटरमध्ये दिसत आहे. तर सान्या मल्होत्रा जवानमधील 'जिंदा बंदा' या गाण्यावर वेड्यासारखी नाचताना दिसत आहे. त्यानंतर सान्या मल्होत्रा थिएटरमध्ये डान्स करताना दिसत आहे. सान्या जवान चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेली होती. तिने चित्रपट पाहण्याचा भरपूर आनंद लुटल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सान्या मल्होत्रा या व्हिडीओमध्ये खूप एनर्जेटिक दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला प्रेक्षकनाची पसंती मिळत आहे. तसेच नेटकरी या व्हिडीओवर हार्ट ईमोजी देखील शेअर करत आहेत.

सान्या मल्होत्राही देखील जवानमध्ये आहे. शाहरुख खानच्या गर्ल गँगमध्ये तिचा समावेश आहे. तिने डॉ.इरामची भूमिका साकारली आहे. तिने तिच्या पात्राला खूप साजेसे काम केले आहे. या चित्रपटात ती शाहरुखसोबत जिंदा बंदा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आता खऱ्या आयुष्यातही तिला या गाण्याचे वेड लागले असल्याचे दिसत आहे.

'जवान'चं कलेक्शन

जवान प्रेक्षकनाचे भरभरून प्रेम मिळत आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत या देशभरात चित्रपटाने जवळपास 202 कोटींची कमाई केली आहे. (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com