Sapna Choudhary New Song : सपना चौधरीचं नवं गाणं सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

हरियाणवी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचे देशभरातील चाहते तिच्या नवीन गाण्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. सपनाचे नवीन हरियाणवी गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.
Sapana Choudhary
Sapana Choudhary Saam Tv

मुंबई : हरियाणवी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचे(Sapna Choudhary) देशभरातील चाहते तिच्या नवीन गाण्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. सपनाचे नवीन हरियाणवी गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. सपना चौधरीने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे नवीन गाणे रिलीज केले आहे. 'दमन' गाण्यात सपना चौधरीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. 'दमन'(Daman) हे गाण रिलीज होताच हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Sapana Choudhary
Khushi Kapoor : जान्हवी कपूरच्या बहिणीने शेअर केले बोल्ड फोटो, खुशीच्या लूकने चाहत्यांची उडवली झोप!

अक्की आर्यन या गायकने 'दमन' या हरियाणवी गायले आहे. त्याचबरोबर हे गाणे सपना चौधरी आणि ध्रुव सिंघल यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. सपनाच्या गाण्यात पूर्ण देसी अवतार पाहायला मिळत आहे. या गाण्यामध्ये लेहेंगा-चोलीतील सपना चौधरीचा लूक जबरदस्त दिसत आहे. सध्या सपनाची अनेक गाणी एकापाठोपाठ एक रिलीज होत आहेत. नुकतेच तिचे 'कमिने' हे गाणे रिलीज झाले. या गाण्यालाही तिच्या चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

Sapana Choudhary
Punjabi Singer Death Threat : सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आता 'या' गायकालाही जिवे मारण्याच्या आल्या धमक्या

सपना चौधरी तिच्या गाण्यांसोबतच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सपना तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिचे अपडेट तिच्या चाहत्यांना देत असते. सपनाच्या देसी लूकसोबतच तिच्या प्रत्येक लूकचे चाहतेही वेडे आहेत.

सपना चौधरीला सलमान खानच्या बिग बॉस शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली. या शोनंतर या हरियाणवी डान्सरने पंजाबी, भोजपुरी आणि हिंदी सिनेमांमध्येही आपले नशीब आजमावले. सपना चौधरीला आज देशभरात पसंत केले जाते. इन्स्टाग्रामवर सपनाचे पाच दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com