Sara Ali Khan and Varun Photo: सारा अली खान आणि वरुण धवनचा व्हॅकेशन मुड ऑन, सोशल मीडियावर नेटकरी करतायेत लाईकचा वर्षाव

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो सारा अली खानने आणि वरून धवनने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Sara Ali Khan and Varun Shares Vacation Photo Instagram
Sara Ali Khan and Varun Shares Vacation Photo InstagramSaam Tv

Sara Ali Khan and Varun Shares Photo: वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'भेडिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'भेडिया'मध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. त्याचा चित्रपट या महिन्याच्या अखेरीस चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. त्याचा एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये तो अभिनेत्री सारा अली खानसोबत दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो सारा अली खानने आणि वरून धवनने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही सेल्फी घेताना दिसत आहेत. वरुण धवन मागे उभे राहून पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सारा मागे उभी राहून पोज देत आहे. वरुण आणि साराचा हा फोटो पाहून हे त्यांचे काही व्हेकेशनवर क्लिक असल्याचे कळते. दोघे एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. फोटोमध्ये वरुण शर्टलेस आहे आणि सारा लाल रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. (Social Media)

Sara Ali Khan and Varun Shares Vacation Photo Instagram
Shehnaaz Gill: शहनाज गिलने दिवंगत सिद्धार्थ शुक्लाला पुरस्कार केला समर्पित, सांगितले खास कारण

सारा अली खान आणि वरुण धवन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आत्तापर्यंत (वृत्त लिहिपर्यंत) साडे पाच लाखांहून अधिक लोकांनी फोटोला लाईक केले आहे आणि कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत. तसेच अनेक यूजर्सनी वरुणला सारापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे. (Celebrity)

सोशल मीडियावर सध्या सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याची बातमी पसरली आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

अभिनेत्री सारा अली खान लवकरच रियल लाईफ भूमिका साकारताना दिसणार आहे. तिचा हा चित्रपट 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. 'ए वतन' या चित्रपटात सारा उषा मेहता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्या स्वातंत्र्य लढ्यात गुप्त रेडिओ ऑपरेटर होत्या. (Movie)

याशिवाय सारा लक्ष्मण उकेटा यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसली होती. (Bollywood)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com