Sara Ali Khan At Cannes Film Festival: कान्समध्ये साडीत दिसली सारा; आजी शर्मिला टागोरच्या लूकची कॉपी

Sara Ali Khan Look In Cannes 2023: सारा अली खानने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील फोटो शेअर केले आहेत.
Sara Ali Khan Look In Cannes 2023
Sara Ali Khan Look In Cannes 2023Instagram @saraalikhan95

Sara Ali Khan In Cannes: कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ ला १६ मे पासून सुरुवात झाली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कान्स २०२३मध्ये पदार्पण केले. तर कान्समधील सारा अली खानने सर्वांना थक्क केले.

गेल्या 24 तासांत, साराने कान्स 2023 मधील तिच्या तीन लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. साराने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वधूच्या आऊटफिटमध्ये पदार्पण केले, तर दुसऱ्या दिवशी तिने ब्लॅक ड्रेसमध्ये एन्ट्री केली. तसेच साराने रेट्रो स्टाईलमध्ये साडी नेसून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले.

सारा अली खानने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील क्रीम कलरच्या साडीतील तिचे अतिशय आकर्षक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा लूक रेट्रो फील देत आहे. या फोटोंमध्ये चाहते साराची तुलना तिची आजी शर्मिला टागोरशी करत आहेत. (Latest Entertainment News)

Sara Ali Khan Look In Cannes 2023
Anushka Sharma Fined By Mumbai Police: अखेर अनुष्काच्या बॉडीगार्डवर कारवाई; मुंबई पोलिसांनी आकाराला१० हजार रुपयांचा दंड

सारा अली खानने इंस्टाग्रामवर अबू जानी आणि संदीप खोसलाच्या लेटेस्ट आउटफिटमध्ये काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना सारा अली खानने लिहिले, 'मला विश्वास आहे की तुम्ही हे करू शकता.' एका फोटोमध्ये सारा अली खान पायऱ्यांवर उभी आहे आणि पदर वाऱ्यावर झुलत आहे. इतर फोटोंमध्ये ती बीचवर उभी राहून पोज देत आहे.

या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'शर्मिला टागोरसारखे हेअर स्टाईल केली आहे.' आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, 'ती आजी शर्मिला टागोरची कॉपी दिसते.'

सारा अली खानने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये डेब्यू केला. मंगळवारी, 16 मे रोजी तिने लेहेंगा घालून रेड कार्पेटवर रॅम्प वॉक केला. तसेच तिने तिच्या ट्रेडमार्क शैलीत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर कान्समधील एका पार्टीत सारा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली.

सारा व्यतिरिक्त, या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलेल्या इतर बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्मा, ईशा गुप्ता, दीपिका पदुकोण आणि मृणाल ठाकूर यांचा समावेश आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्या दिवशी उर्वशी रौतेलाही दिसली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com