
Sara Ali Khan On Getting Married To A Cricketer: अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. कधी ट्रोल तर कधी कौतुक होत असणारी सारा काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका आयपीएलच्या मॅचमध्ये तिने हजेरी लावली होती. त्यावर तिला नेटकऱ्यांनी ‘शुभमनला सपोर्ट करायला आली का?’ म्हणत तुफान ट्रोल केलं होतं. सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर राहणाऱ्या साराची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत साराला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
सारा अली खानच्या नावाची आणि क्रिकेटर शुभमन गिलच्या नेहमीच नावाची चर्चा होते. या दोघांनीही त्यांच्या नात्याला अद्याप कोणतेही नाव दिलेलं नाही. मात्र क्रिकेटरशी लग्न करणार का, या प्रश्नाचं उत्तर साराने फार प्रामाणिकपणे दिलं आहे. साराला मुलाखतीत, तू सुद्धा आजी शर्मिला टागोर यांच्याप्रमाणे क्रिकेटरसोबत लग्न करतेय का?, असा प्रश्न साराला विचारण्यात आला होता.
यावर सारा म्हणते, “माझा जोडीदार अभिनेता, क्रिकेटर, व्यावसायिक किंवा डॉक्टर यापैकी व्यवसायाने तो काहीही असला तरी मला चालेल. पण फक्त डॉक्टर नको, कारण तो कधीही पळून जाण्याची शक्यता आहे. असो... पण मस्करी बाजूला ठेवून बोलायचे तर, माझ्या जोडीदाराने मानसिक आणि बौद्धिक पातळीवर माझ्याशी जुळून घ्यायला हवं. जर तुम्ही ते करू शकलात तर खूपच छान. माझा जोडीदार कोण आहे किंवा तो काय करतो त्यापेक्षा माझ्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.”
सोबतच यावेळी साराला ‘तू भारतीय क्रिकेट टीममधील कोणत्या व्यक्तीला सध्या डेट करते?’ असा प्रश्न विचारला तेव्हा, सारा म्हणते, “मी या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे देते, मी आतापर्यंत अशा कोणत्याच व्यक्तीला भेटली नाही, ज्याचा सोबत मी माझं संपूर्ण आयुष्य त्यासोबत घालवू शकते.” सोबतच सारा तिच्या मुलाखतीत पुढे म्हणते, साराने सांगितले की तिला “ ‘जरा हटके जरा बचके’ सारखा जरी लाईफ पार्टनर मिळाला तरी चालेल, मी त्याला डेट करेल.” असं म्हणत तिने आपली चॉईस देखील सांगितली.
साराच्या लव्हलाईफबद्दल बोलायचे तर, साराने सर्वात आधी ‘कॉफी विथ करण’मध्ये अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर कार्तिक आणि सारा दोघेही काही दिवसांसाठी एकत्र रिलेशनशिपमध्येही होते. पण त्यांचं ते नातं फार काळ काही टिकू शकल नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.